Next
‘हीलिंग हँड्स’तर्फे ‘थ्रीडी पेल्विक फ्लोर इमेजिंग’ सुविधा
प्रेस रिलीज
Saturday, July 28 | 11:26 AM
15 0 0
Share this story

पुणे : हीलिंग हँड्स क्लिनिकमध्ये थ्रीडी पेल्विक फ्लोर इमेजिंगची सुविधा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे ‘एमआरआय’चा वापर न करताच कॉम्प्लेक्स फिस्तुला यांसारख्या गुंतागुंतीच्या आजारांचे अचूक आणि कमी वेळेत निदान करणे आता शक्य झाले आहे.

जगभरात काही निवडक ठिकाणीच ही सुविधा उपलब्ध आहे. रेक्टल कॅन्सरचे अचूक निदान आणि शस्त्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या रुग्णाच्या शरीराच्या विशिष्ट भागाच्या स्पष्ट प्रतिमा मिळविण्यासाठी थ्री-डी पेल्विक फ्लोर इमेजिंगचा फायदा होतो.

हीलिंग हँड्स क्लिनिकचे संस्थापक आणि कोलोरेक्टल सर्जन डॉ. अश्विन पोरवाल म्हणाले, ‘जगभरातील निवडक ठिकाणीच अशी सुविधा उपलब्ध आहे. सुमारे वीस ते तीस टक्के रुग्णांना ‘एमआरआय’ करताना भीती वाटत असते. अशा रुग्णांच्या आजाराच्या निदानासाठी, स्क्रीनिंगसाठी तसेच डेफेकोग्राफीसाठी ही सुविधा उपयुक्त आहे. थ्रीडी पेल्विक फ्लोर इमेजिंग सुविधा ही रुग्णांच्या दृष्टीने अत्यंत सोयीची आहे. त्यासाठी फक्त १५ मिनिटांचा वेळ लागतो.’

रेडिओलॉजिस्ट डॉ. समीर शहा म्हणाले, ‘कॉम्प्लेक्स फिस्तुला, स्फिंक्टर डिफेक्टचे निदान, रेक्टल कॅन्सरचे निदान, इन्कॉन्टिनंसची शस्त्रक्रिया, फिस्तुला रिपेअर आणि सातत्याने होणाऱ्या बद्धकोष्ठतेच्या निदानासाठी थ्रीडी पेल्विक फ्लोर इमेजिंगचा वापर केला जातो.’

डॉ. पोरवाल यांनी विकसित केलेल्या डीएलपीएल तंत्रज्ञाना हीलिंग हँड्स क्लिनिकमध्ये यापूर्वीही अत्याधुनिक व नाविन्यपूर्ण उपचार, शस्त्रक्रियांचा फायदा रुग्णांना झाला आहे. मूळव्याध व बद्धकोष्ठतेसाठी एमसीडीपीए, वारंवार होणाऱ्या बद्धकोष्ठतेसाठी बायोफिडबॅक तसेच डिट़ॉक्स व कोलोन क्लिन्सिंगसाठी कोलोन हायड्रोथेरपीची सुविधाही हिलिंग हँड्स क्लिनिकमध्ये उपलब्ध आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link