Next
महिला अर्ध मॅरेथॉनमध्ये यामिनी ठाकरे,सुनीता खापडे विजयी
प्रेस रिलीज
Monday, March 12, 2018 | 05:37 PM
15 0 0
Share this story


पुणे : ‘सेलिब्रेटिंग वुमनवूड’ या संकल्पनेवर आधारीत महिलांची अर्ध मॅरेथॉन (पीडब्ल्यूएचएम) स्पर्धा रविवारी,११मार्च रोजी पार पडली. या स्पर्धेत तब्बल सात हजार महिलांनी सहभाग घेतला होता. यात २१ किलोमीटर प्रकारात यामिनी ठाकरे, तर १० किलोमीटर प्रकारात सुनीता खापडे विजेत्या ठरल्या. त्यांच्यासह अन्य विजेत्या महिलांचा आदर पूनावाला स्वच्छ शहर उपक्रमाकडून सत्कार करण्यात आला. 
 
खासकरून महिलांसाठी आयोजित करण्यात आलेली ही पुण्यातील एकमेव अर्ध मॅरेथॉन ठरली आहे. या स्पर्धेला पोलीस दल, सेनादल कल्याण संघटना (आर्मी वेलफेअर असोसिएशन) व इतर संघटनांचाही पाठिंबा लाभला होता. त्यात पोलीस तसेच, सेनादलाशी संबंधित महिलांचाही समावेश होता.ही अर्ध मॅरेथॉन स्पर्धा पाषाण येथे सकाळी ६.३० वाजता सुरू झाली. 

 आपले शहर स्वच्छ व सुंदर बनावे यासाठी आदर पूनावाला स्वच्छ शहर उपक्रमाकडून प्रयत्न सुरू असून, त्यासाठी अत्याधुनिक अशी साधनसामुग्री आणि तंत्रज्ञान वापरले जात आहे. आदर पूनावाला स्वच्छ शहर उपक्रमाच्या या प्रयत्नांमुळेच पुण्याचे रूपांतर हे देशातील एक सर्वांत स्वच्छ शहर म्हणून होत आहे. याच उपक्रमाने या अर्ध मॅरेथॉनला प्रायोजकत्व दिले होते. पुणे हे आरोग्यदायी शहर म्हणून पुढे आणावे ही त्यामागची भूमिका आहे. 

 पुणे महिलांच्या अर्ध मॅरेथॉनबाबत बोलताना आदर पूनावाला स्वच्छ शहर उपक्रमाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णन कोमन्दूर म्हणाले, ‘ही अर्ध मॅरेथॉन महिलांची सत्ता आणि अजोड क्षमता यांच्या प्रदर्शनाचा एक ठळक उपक्रम ठरला आहे. या उपक्रमाशी जोडले जाणे हा आम्ही आमचा बहुमानच मानतो. आरोग्यदायी शहरासाठी आरोग्यदायी जीवनशैली निर्माण करण्याबाबत लोकांना प्रोत्साहन देण्याचा आमचा उद्देश त्याच्यापर्यंत पोहोचवण्याची ही संधी म्हणूनच आम्ही या उपक्रमाकडे पाहत आहोत. त्यात सहभागी झालेल्या महिलांनी या स्पर्धेचा आनंद लुटला असेल याची आम्हाला आशा आहे आणि पुढच्या काळातही त्या यात सहभागी होतील.’

पुणे महिलांच्या अर्ध मॅरेथॉनचे प्रवक्ते म्हणाले, ‘या वर्षीच्या स्पर्धेसाठी तब्बल सात हजार महिलांची नोंद करण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. त्याद्वारे लोकांसाठी आरोग्यदायी जीवनशैली रुजवण्यासाठी कारणीभूत ठरलो आहोत, याचाही आनंद आहे. ‘चांगल्या भविष्यासाठी आरोग्यदायी जीवनशैली’ हा महत्त्वाचा संदेश देणे हा आमचा उद्देश आहे. तो  आदर पूनावाला स्वच्छ शहर उपक्रमाच्या ध्येयधोरणांशी मिळता जुळता आहे. त्यामुळेच यासाठी त्यांचे सहकार्य मिळणे हा आम्ही आमचा बहुमान समजतो.’

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link