Next
‘फिक्की फ्लो’तर्फे आदिवासी मुलींना सॅनिटरी नॅपकिनचे वाटप
प्रेस रिलीज
Saturday, January 19, 2019 | 04:20 PM
15 0 0
Share this storyपुणे : महिलांसाठी देशपातळीवर काम करणाऱ्या ‘फिक्की फ्लो’ या संस्थेच्या पुणे शाखेतर्फे ‘वूमन अँड हायजीन’ या प्रकल्पाअंतर्गत राज्यातील ४०० आदिवासी मुलींना पर्यावरणपूरक सॅनिटरी नॅपकिन व वैयक्तिक स्वच्छता किटचे वाटप करण्यात आले. या वेळी खासदार वंदना चव्हाण प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.

‘फिक्की फ्लो- पुणे’च्या अध्यक्षा संगीता ललवाणी यांनी ही माहिती दिली. ही वैयक्तिक स्वच्छता किटस् कॅनडातील ‘डेज फॉर गर्ल्स’ या संस्थेने पुरविली असून, त्यांचे  वैशिष्ट्य म्हणजे त्यात तीन वर्षे पुनःपुन्हा वापरता येण्याजोग्या आधुनिक स्वरूपाच्या पर्यावरणपूरक सॅनिटरी नॅपकिन्सचा समावेश आहे. भोसरी येथील मुलींच्या वसतीगृहात नुकताच हा कार्यक्रम पार पडला.

‘फिक्की फ्लो पुणे’तर्फे रोटरी क्लब ऑफ पुणे कँटोनमेंट आणि राज्य शासनाचा आदिवासी विकास विभाग यांच्या सहकार्याने ‘वूमन अँड हायजीन’ हा प्रकल्प राबवला जात आहे. या अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या वैयक्तिक स्वच्छता साहित्य वाटपाच्या कार्यक्रमात संगीता ललवाणी यांच्यासह सहाय्यक जिल्हाधिकारी व घोडेगाव येथील सर्वंकष आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी आयुष प्रसाद, ‘वूमन अँड हायजीन’ अध्यक्षा उषा पूनावाला, ‘रोटरी क्लब ऑफ पुणे कँटोनमेंट’चे अध्यक्ष पंकज आपटे, ‘रोटरी’च्या सेवा प्रकल्प विभागाचे सहसंचालक समीर रूपानी उपस्थित होते.

गेल्या महिन्यात आयोजित ‘फ्लो हाफ मॅरेथॉन’मध्येही आदिवासी मुलींनी काँर्पोरेट कंपन्यांच्या पदाधिकाऱ्यांबरोबर धावण्यात उत्साहाने भाग घेतला. जवळपास १२ हजार लोक या मॅरेथॉनमध्ये धावले. संस्थेतर्फे आदिवासी विकास विभागाच्या सहकार्याने विविध उपक्रम राबवले जात असून त्यात ६००० मुलांसाठी आरोग्य तपासणी व उपचार शिबिरांचा समावेश आहे. शस्त्रक्रिया गरजेची असलेल्या बालरुग्णांच्या शस्त्रक्रियाही या उपक्रमात केल्या जाणार आहेत, असे संगीता ललवाणी यांनी सांगितले.

संस्थेतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या ‘फ्लो पुणे हाट’ या प्रदर्शनातही आदिवासी विकास विभागाचा सहभाग असून, या माध्यमातून आदिवासी कलाकारांच्या कलेस व्यासपीठ मिळावे यासाठी प्रयत्न केला जात असल्याचे ललवाणी यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link