Next
भिवंडीत भारतीय लोक क्रांती सामाजिक संघटनेचा उद्घाटन सोहळा
खुल्या कविसंमेलनाला चांगला प्रतिसाद
मिलिंद जाधव
Saturday, November 24, 2018 | 05:46 PM
15 0 0
Share this storyभिवंडी :
 भारतीय लोक क्रांती सामाजिक संघटनेचा उद्घाटन सोहळा नुकताच भिवंडी शहरातील भादवड येथे पार पडला. या वेळी खुले कवी कविसंमेलनही झाले. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. 

या वेळी ‘भिवंडी पूर्व’चे आमदार रूपेश म्हात्रे, श्रमजीवी संघटनेचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सापटे, समाजसेवक रमेश दिवेकर, नागरिक बँक चेअरमन गोरखनाथ म्हात्रे, ठाणे जिल्हा भ्रष्टारचार विरोधी न्यासाचे अध्यक्ष प्रभाकर जाधव, समाजसेविका चंदाताई बॅनर्जी, कल्याण-डोंबिवली मनपा कार्यकारी अभियंता बबन बरफ आदी उपस्थित होते. उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी या वेळी संघटनेला शुभेच्छा दिल्या. 

संघटनेचे पदाधिकारी किशोर भोईर, विजय भावर, सुनील दांडेकर, संजय गुरुडे, गणराज सापटे, शाम निखाडा या वेळी उपस्थित होते. कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी  साहित्यिक सुनील पाटील होते. ‘नवीन कवींना एक विचारमंच उपलब्ध करून देणे हा उद्देश आहे. कविता आयुष्य घडवत असते. लेखणीला धार देण्याचे काम सातत्याने आम्ही कविसंमेलनाच्या माध्यमातून करणार आहोत,’ असे कवी विष्णू खांजोडे यांनी प्रास्ताविकात सांगितले. ‘कविता माणसाला विचार करायला लावते आणि कविसंमेलनात बोलके करते,’ असे कविसंमेलनाचे अध्यक्ष सुनील पाटील यांनी सांगितले. 

विविध ठिकाणांहून आलेल्या कवींनी विविध विषयांवर स्वरचित दर्जेदार कविता या वेळी सादर केल्या. कार्यक्रमात ७५ कवी सहभागी  झाले होते. मोठ्या संख्येने साहित्यिक, कवी, हितचिंतक उपस्थित होते. शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, ‘भिवंडी ग्रामीण’चे आमदार शांताराम मोरे, कोकण मराठी साहित्य परिषदेचे मुरबाड तालुका अध्यक्ष लक्ष्मण घागस, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे भिवंडी तालुका अध्यक्ष संदीप कांबळे, भिवंडी शहर अध्यक्ष उदय क्षीरसागर, अॅड प्रज्ञेश सोनावणे, ज्येष्ठ, कवी गायक मास्टर राजरत्न राजगुरू, भिवंडी लेबर फ्रंट युनियन सरचिटणीस संतोष चव्हाण, नगरसेविका मनीषा दांडेकर, साहित्यिक विजयकुमार भोईर, साहित्यिक जगदेव भटू, कवी नवनाथ रणखांबे, संघटनेचे सुनील दांडेकर, किशोर भोईर आदी उपस्थित होते. 

या कार्यक्रमानिमित्त सहभागी कवींना भारतीय लोक क्रांती सामाजिक संघटनेच्या वतीने सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. संघटनेच्या अध्यक्षा मनीषा दांडेकर, कार्याध्यक्ष सुनील दांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन रमेश म्हसकर यांनी, तर कविसंमेलनाचे सूत्रसंचालन कवी मिलिंद जाधव यांनी केले. आभार सुनील दांडेकर यांनी मानले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Sunil kanhu dandekar About 60 Days ago
I like this new and I hope that you are always best in future......thanks again
0
0

Select Language
Share Link