Next
‘सुपरमाईंड’ला ‘बिझनेस एक्सलन्स अॅवॉर्ड’ प्रदान
प्रेस रिलीज
Tuesday, April 24 | 11:37 AM
15 0 0
Share this story

सुपरमाईंड संस्थेच्या संचालिका मंजुषा वैद्य यांना एसएमई मॉरिशसचे ‘बिझनेस एक्सलन्स अॅवॉर्ड’  महाराष्ट्राचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या वेळी आमदार मेधा कुलकर्णी, मॉरिशसचे औद्योगिक मंत्री सौमिलदत्त भोला उपस्थित होते.

पुणे :
मॉरिशस येथे नुकत्याच झालेल्या उद्योजकांच्या युवाकॉन २०१८ परिषदेत येथील सुपरमाईंड संस्थेला एसएमई मॉरिशसतर्फे ‘बिझनेस एक्सलन्स अॅवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्राचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते संस्थेच्या संचालिका मंजुषा वैद्य यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या प्रसंगी आमदार प्रा. मेधा कुलकर्णी, मॉरिशसचे औद्योगिक मंत्री सौमिलदत्त भोला, महाराष्ट्रातील उद्योगपती श्रीकांत बडवे व डेप्युटी हाय कमिशन इंडियाचे श्री. देवल उपस्थित होते.

‘सुपरमाईंड’ गेल्या दहा वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहे. दहा वर्षांपूर्वी मंजुषा वैद्य, अर्चिता मडके, दया कुलकर्णी व वैशाली केसकर या चार महिला उद्योजकांनी ‘सुपरमाईंड’ची स्थापना केली. शैक्षणिक समुपदेशक, ई-लर्निंग, स्वअध्ययन, शैक्षणिक व्याखाने अशा अनेक उपक्रमाद्वारे ‘सुपरमाईंड’ महाराष्ट्रभर काम करत आहे. सहाशेहून अधिक समुपदेशकांद्वारे ‘सुपरमाईंड’ने गेल्या दहा वर्षांत तीस हजार विद्यार्थ्यांना विनामूल्य शैक्षणिक समुपदेशन केले आहे.

‘लघुउद्योजकांना अधिक प्रभावीपणे व्यवसाय करण्यासाठी भारत व महाराष्ट्र सरकारने अनेक योजना उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याचा नवउद्योजकांनी लाभ घ्यावा,’ असे उद्योगमंत्री देसाई यांनी या वेळी सांगितले, तर ‘मॉरिशस व भारतातील उद्योजकांमधील देवाण-घेवाण होण्यासाठी युवाकॉन परिषदेचा फायदा होईल,’ असा विश्वास सौमिलदत्त भोला यांनी व्यक्त केला.

‘महिला उद्योजिकांनी सुरू केलेल्या पुण्याच्या सुपरमाईंड संस्थेला मिळालेला पुरस्कार हा पुण्यासाठी अभिमानास्पद आहे,’ असे आमदार कुलकर्णी म्हणाल्या. यंदा संस्था दशकपूर्ती साजरी करत असताना त्यात या पुरस्कारची भर पडल्यामुळे आम्हाला खूप प्रोत्साहन मिळाल्याचे ‘सुपरमाईंड’च्या संचालिका वैद्य यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link