Next
पौर्णिमेच्या चांदण्यात रंगणार अरुणा ढेरे यांची काव्यमैफल
‘एमटीडीसी’चा उपक्रम
BOI
Thursday, February 14, 2019 | 05:57 PM
15 1 0
Share this article:

मुंबई : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने (एमटीडीसी) येत्या माघ पौर्णिमेला ‘यक्षरात्र’ या काव्य मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. पानशेत-वरसगाव धरणाच्या कुशीत वसलेल्या ‘एमटीडीसी’च्या पानशेत रिसॉर्ट येथे ज्येष्ठ कवयित्री, लेखिका आणि ९२व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांची ही काव्यमैफल रंगणार आहे. येत्या मंगळवारी, १९ फेब्रुवारी २०१९ रोजी सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत हा कार्यक्रम होणार आहे.

या उपक्रमाविषयी माहिती देताना ‘एमटीडीसी’चे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे म्हणाले, ‘पर्यटकांमध्ये साहित्याविषयी आवड निर्माण व्हावी, थोर साहित्यिकांचा त्यांना सहवास लाभावा या उद्देशाने पौर्णिमा महोत्सवाचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. ‘एमटीडीसी’च्या राज्यभरातील रिसॉर्टमध्ये दर पौर्णिमेच्या रात्री हा उपक्रम राबविण्यात येत आहे. येत्या पौर्णिमेला ज्येष्ठ साहित्यिका डॉ. अरुणा ढेरे यांना आमंत्रित करण्यात आले असून, पर्यटक आणि साहित्य रसिकांना त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. राज्याच्या विविध भागात निसर्गरम्य पर्यटनस्थळी वसलेल्या ‘एमटीडीसी’च्या रिसॉर्टचा पर्यटकांना परिचय व्हावा हाही या उपक्रमाचा उद्देश आहे.


अरुणा ढेरे यांचे ‘काळोख आणि पाणी’सारखे महाभारत व लोकपरंपरांचा परस्पर अन्वय लावणारे पुस्तक, ‘कृष्ण किनारा’सारखे राधा, कुंती, द्रौपदी यांचे भावबंध उलगडणारे पुस्तक, महाव्दार किंवा मैत्रेयी यांसारख्या लघु कादंबऱ्या अशा विविध साहित्यकृतींमधील कविता, गीतकाव्याच्या मैफलीचा आनंद पर्यटकांना घेता येणार आहे.    
 
15 1 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search