Next
एकनाथजी रानडे यांच्या ‘सेवा समर्पण’ ग्रंथाचे शनिवारी प्रकाशन
प्रेस रिलीज
Wednesday, August 22, 2018 | 06:14 PM
15 0 0
Share this article:

पुणे : विवेकानंद केंद्राचे संस्थापक एकनाथजी रानडे यांच्या उद्बोधनपर भाषणांचे संकलन असलेल्या ‘सेवा समर्पण’ (अध्यात्मिक जीवनाची साधना) ग्रंथाचे प्रकाशन शनिवारी, २५ ऑगस्ट रोजी पुण्यात टिळक स्मारक मंदिर येथे निवृत्त सनदी अधिकारी आणि ‘चाणक्य मंडल’चे संस्थापक अविनाश धर्माधिकारी आणि ‘लोकमान्य मल्टीपर्पज को ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटी’चे संस्थापक अध्यक्ष किरण ठाकूर यांच्या हस्ते होणार आहे. 

एकनाथजी रानडे यांनी जीवनव्रती प्रशिक्षणार्थींना वेळोवेळी केलेल्या उद्बोधनपर व्याख्यानांचे संकलन ‘सेवा समर्पण’ या ग्रंथात आहे. या पुस्तकाचे लेखन सुनिता करकरे यांनी, तर संपादन निवेदिता भिडे यांनी केले आहे. या कार्यक्रमात अविनाश धर्माधिकारी यांचे ‘प्रशासनातील सेवाभाव’ विषयावर व्याख्यान होणार आहे. सुधीर जोगळेकर (मराठी प्रकाशन विभागाचे सचिव), जयंत कुलकर्णी (विवेकानंद केंद्र संचालक, पुणे शाखा) यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. 

कन्याकुमारीतील शिलाखंडावरील विवेकानंद स्मारकाला २०२० मध्ये ५० वर्षे होत आहेत, तर विवेकानंद केंद्राच्या स्थापनेला २०२२ मध्ये ५० वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने विवेकानंद केंद्राच्या मराठी प्रकाशन विभागाने अनेक महत्वाकांक्षी प्रकाशनांची आखणी केली आहे. केंद्राचे संस्थापक एकनाथजी रानडे यांनी विवेकानंदांचा विचार देशभर घेऊन जाणाऱ्या जीवनव्रती कार्यकर्त्यांची कल्पना मांडली आणि तिला देशभरातून युवक-युवतींचा उत्तम प्रतिसाद लाभला. त्यातून निवडलेल्या कार्यकर्त्यांपुढे एकनाथजी ४० व्याख्याने गुंफत असत. ती सर्वच व्याख्याने ध्वनिमुद्रित झाली नव्हती, परंतु त्यातल्या अनेकांची टिपणे कालांतराने उपलब्ध होत गेली. त्या व्याख्यानांचे शब्दांकन म्हणजे पूर्वीचे ‘सेवा साधना’ आणि आत्ताचे विस्तारित रूपातील ‘सेवा समर्पण’ हा ग्रंथ आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search