Next
अमूर्त चित्रांचे अंतर्मुख करणारे चित्र प्रदर्शन
पु. ना. गाडगीळ आणि सन्स आर्ट इनिशिएटिव्हतर्फे आयोजन
BOI
Thursday, August 30, 2018 | 04:53 PM
15 0 0
Share this article:

हॅपी कॉलनीतील पु. ना. गाडगीळ आणि सन्सच्या कला दालनातील  दुर्मिळ चित्रांचे प्रदर्शन पाहताना रसिक
पुणे : आधुनिक भारतीय चित्रकलेचा उदय अन् विकास ब्रिटिश कला परंपरेतून आणि शिक्षण पध्दतीतून झाला असून, अशाच परंपरेतील दुर्मिळ चित्रांचे ‘अंतर्मुख आणि अमूर्त’ हे प्रदर्शन येथील  पु. ना. गाडगीळ आणि सन्स आर्ट इनिशिएटिव्ह अंतर्गत भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन नॅशनल फिल्म आर्काइव्ह ऑफ इंडिया (एनएफएआय) माजी संचालक सुरेश छाब्रिया यांच्या हस्ते नुकतेच झाले. अजित गाडगीळ, नंदू देवळे, क्यूरेटर राजू सुतार, विक्रम मराठे यांच्यासह अनेक कलाकार या वेळी उपस्थित होते. 

कर्वे रस्त्यावरील हॅपी कॉलनीतील पु. ना. गाडगीळ आणि सन्सच्या कला दालनात हे प्रदर्शन सुरू असून, सय्यद रजा हैदर,  प्रभाकर बर्वे,  प्रभाकर कोलते,  कृष्णमचारी बोस,  जॉन टून्सेन,  राम कुमार,  सदानंद बाकरे,  राजू सुतार, वैशाली ओक,  विक्रम मराठे आदी कलाकारांनी काढलेली मूळ चित्रे येथे आहेत. 

नऊ सप्टेंबरपर्यंत (सोमवार सोडून) सकाळी ११ ते रात्री आठपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे.

‘येथील चित्रे दुर्मिळ कलाप्रकारातील असून, कलाप्रेमींना एकाच ठिकाणी पाहण्याची संधी यामुळे मिळाली आहे. आपल्या देशात सुरू झालेल्या आधुनिक कलेच्या चळवळीची माहिती यामुळे मिळेल’, असा विश्वास क्यूरेटर राजू सुतार यांनी व्यक्त केला.

‘स्वातंत्र्यपूर्व काळातील पाश्चिमात्य रंग व तंत्र भारतीय चित्रकारांनी सहजतेने आत्मसात केले होते. त्यामुळे अनेक भारतीय चित्रकारांची चित्र लंडनच्या रॉयल अॅकॅडमीत प्रदर्शित झाली होती आणि नावाजली पण गेली. त्यामुळेच या प्रदर्शनाद्वारे ‘अंतर्मुख आणि अमूर्त’ यातून दिसणारे अमूर्त कलेतील निरनिराळे टप्पे रसिकांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. मात्र, यातील अमूर्त कला पाश्च्यात्य अभिव्यक्तीवादी अमूर्ततेपेक्षा भिन्न असून, भारतीय विचारांना जवळची आहे’, असे सुतार यांनी सांगितले.

‘अंतर्मुख आणि अमूर्त’  चित्र प्रदर्शन 
स्थळ :  पु. ना. गाडगीळ आणि सन्स दालन, हॅपी कॉलनी, कोथरूड 
वेळ :  ९ सप्टेंबरपर्यंत (सोमवार वगळून) सकाळी ११ ते रात्री ८.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search