Next
वजोर डॉट कॉम स्टोअरचे उद्घाटन
प्रेस रिलीज
Wednesday, January 10 | 12:58 PM
15 0 0
Share this story


पुणे : बरेच महिने प्रतीक्षा केल्यावर वजोर डॉट कॉमच्या प्रेमींना अखेर दिलासा मिळाला आहे. ‘वजोर डॉट कॉम’च्या पहिल्या स्टोअरचे उद्घाटन पाच जानेवारी रोजी मॉडेल कॉलनी येथे झाले. 

वजोर डॉट कॉमची क्रेझ फॅशनप्रेमींमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. फॅशनप्रेमींच्या उदंड प्रतिसादामुळे वजोर डॉट कॉमने आपले ऑफलाइन स्टोअर काढण्याचे ठरविले. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि युजर फ्रेंडली शॉपिंग हे वजोर डॉट कॉमचे वैशिष्ट्य असेल.

या स्टोअरमध्ये येणे हा ग्राहकांसाठी एक अनोखा अनुभव असणार आहे. हे स्टोअर १८शे स्क्वेअर फूट जागेत उभारले गेले आहे. उद्घाटनाला अनेक मान्यवर व्यक्ती, आदरणीय सदस्य, ब्लॉगर्स, मिडिया प्रोफेशनल, आणि अनेक प्रामाणिक ग्राहक आले होते. ग्रीनर आणि क्लीनर प्लॅनेटवर प्रचंड विश्वास आणि श्रद्धा असल्याने, वजोर डॉट कॉमने सोहळ्याला उपस्थित असलेल्या  प्रत्येकाला एक रोपटे देऊन आपली कृतज्ञता व्यक्त केली. हे रोपटेही त्यांनी वाढताना बघावे, जसे त्यांनी वजोर डॉट कॉमला पहिले असा त्यामागचा विचारही त्यांनी बोलून दाखविला.

वजोर डॉट कॉम आजतागायत आपल्या ध्येयाप्रती प्रामाणिक आणि स्पष्ट राहिले आहे. फॅशन ही आता फक्त एक उपयुक्त वस्तू नसून त्याला अतिशय महत्व प्राप्त झाले आहे; त्यामुळेच ग्राहकांना ३६० डिग्री शॉपिंगचा अनुभव मिळावा, म्हणून वजोरडॉट कॉम ऑफलाइन आले आहेत. यात त्यांचे सिग्नेचर फॅशन आणि लाइफस्टाइल प्रॉडक्ट आहेत.

वजोर डॉट कॉमच्या अनोख्या उपक्रमात प्रत्येक महिन्याच्या कलेक्शनमागील कहाणी सांगितले जाते. प्रत्येक वजोर डॉट कॉमच्या स्टोअर मध्ये टचस्क्रीन्स असून, ग्राहक सर्व प्रकारचे प्रॉडक्ट्स येथील स्क्रीनवर बघून, ते ऑफलाइन किंवा ऑनलाइन मागवू शकतात. वजोर डेकोरही प्रत्येक स्टोअरमध्ये उपलब्ध आहे. हे स्टोअर आठवड्याचे सातही दिवस ८ ते १० या वेळेत सुरू राहील. 
 
वजोर डॉट कॉम २०१८ मध्ये चेन्नई आणि दिल्लीत स्टोअर उघडणार असून, आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला विस्तार करण्याच्या तयारीत आहे.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link