Next
डॉ. आंबेडकर महाविद्यालयात प्लेसमेंट सेलचे उद्घाटन
प्रेस रिलीज
Tuesday, September 11 | 03:05 PM
15 0 0
Share this story

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात प्लेसमेंट सेलच्या उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना अमेय नलावडे.औंध : रयत शिक्षण संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात प्लेसमेंट सेलचा उद्घाटन समारंभ पुणे येथील डायरेक्टर अमेय नलावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

या वेळी मार्गदर्शन करताना ते म्हणाले, ‘विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करायला पाहिजे. भविष्यात आपल्याला कुठे जायचे आहे हे आजच ठरवून त्यानुसार आपण वाटचाल केल्यास आपण यशाच्या शिखरावर विराजमान होऊ शकतो.’

कार्यक्रमाला उपस्थित विद्यार्थीमहाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. मंजुश्री बोबडे म्हणाल्या, ‘तरुणांपुढे नवी स्वप्ने असतात. आपली परिस्थिती बदलण्यासाठी आपण स्वतःच उभे राहिले पाहिजे. आपल्यासमोर अनेक स्वप्ने आणि आव्हाने आहेत. त्यांना सामोरे जाण्याची क्षमता वाढावी यासाठी पारंपरिक शिक्षणाबरोबर कौशल्ययुक्त प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले जात आहे. प्लेसमेंट सेल विभागामार्फत अनेक विद्यार्थ्यांना नोकरी मिळाली आहे. यापुढेही अनेक विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील.’

या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. विलास सदाफळ, प्लेसमेंट सेलचे चेअरमन डॉ. हर्षद जाधव, प्रा. कुशल पाखले, प्रा. किरण कुंभार, डॉ. अतुल चौरे उपस्थित होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link