Next
‘वंचित घटकांसाठी समाजानेही योगदान द्यावे’
प्रेस रिलीज
Saturday, May 05 | 03:45 PM
15 0 0
Share this storyपुणे : ‘ज्यांची काहीच चुकी नाही, पण माता-पित्यांमुळे जीवघेण्या एड्स आजाराला बळी पडलेत, अशा मुलांसाठी एखादी संस्था, व्यक्ती कार्य करीत आहे ही बाब खूप मोलाची आहे. त्यामुळे त्यांच्या कार्याला समाजानेही हातभार लावला पाहिजे. वंचित घटकांसाठीही योगदान दिले पाहिजे,’ अशी अपेक्षा सिनेअभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी व्यक्त केली.

माजी उपमहापौर आबा बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहर काँग्रेसचे सरचिटणीस अमित बागुल आणि मित्र परिवाराने गुजर निंबाळकर वाडी येथील ममता फाउंडेशनमधील एड्सग्रस्त मुला-मुलींसाठी ‘मनसोक्त आंबे खा पार्टी’चे आयोजन केले होते. त्यात प्राजक्ता माळीही सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी त्या बोलत होत्या.

त्या म्हणाल्या, ‘समाजापासून वंचित असलेल्या या मुलांसाठी कोणतेही शासकीय अनुदान नसतानाही शिल्पा बुडुख काम करीत आहेत आणि या मुलांच्या चेहऱ्यावर आनंद यावा, त्यांचे शेवटचे जीवन सुसह्य व्हावे, ते आनंदाने जगावे यासाठी माजी उपमहापौर आबा बागुल, अमित बागुल आणि मित्रपरिवार सातत्याने विविध कार्यक्रम या मुलांबरोबर घेतात हे खूप महत्त्वाचे आहे आणि समाजानेही या वंचित मुलांसाठी योगदान द्यावे.’

या वंचित मुलांसाठी अमित बागुल आणि त्यांच्या मित्रपरिवाराकडून दिवाळी पहाट, दिवाळी संध्या, नववर्ष स्वागत, विविध सणवार वर्षभर साजरे केले जातात, गेले दहा वर्षे हे उपक्रम सुरू आहेत. विशेष म्हणजे या मुलांच्या हवाई सफरची इच्छा अमित बागुल यांच्या वाढदिवसानिमित्त दोनवेळा पूर्ण करण्यात आलेली आहे. शिल्पा बुडुख यांनी ही माहिती प्राजक्ता माळी यांना दिली. त्यावर ‘माझ्यापरीने मीही या उपक्रमात सहभाग असेन’, अशी अशी ग्वाही त्यांनी दिली.

याप्रसंगी पुणे शहर काँग्रेसचे सरचिटणीस अमित बागुल, जयकुमार ठोंबरे, सतीश कांबळे, सन्मित चौधरी, धनंजय कांबळे, अमर ससाणे, महेश ढवळे, ज्योती अरविंद, रजिया बल्लारी, इम्तियाज तांबोळी, अभिषेक बागुल, संतोष पवार, बाबासाहेब पोळके, सुरेश कांबळे, सागर आरोळे आदी उपस्थित होते.

(आंबा पार्टीचा व्हिडिओ सोबत देत आहोत .)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link