Next
‘टीएएफई’तर्फे जेफार्म सर्व्हिसेस देशभरात सादर
प्रेस रिलीज
Friday, September 28, 2018 | 05:06 PM
15 0 0
Share this story

मुंबई : ट्रॅक्टर्स अँड फार्म इक्विपमेंट लिमिटेड (टीएएफई) या भारतातील ट्रॅक्टर उत्पादक कंपनीने राष्ट्रीय विस्ताराचा सीएसआर प्रकल्प जेफार्म सर्व्हिसेस आणि जेफार्म सर्व्हिसेस अॅप सुरू केल्याचे जाहीर केले.

भारतीय शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी आणि तंत्रज्ञानावर आधारित सक्षम अर्थव्यवस्था आणण्यासाठी हे प्रमुख व्यासपीठ असणार आहे. जेफार्म सर्व्हिसेसतर्फे शेतकऱ्यांना ट्रॅक्टर आणि अन्य अत्याधुनिक शेतकी यंत्र विनामूल्य मिळवून देणार आहे. ज्या शेतकऱ्यांना त्यांचे ट्रॅक्टर्स व शेतकीची इतर साधने भाडेतत्त्वावर द्यायची आहेत, त्यांना थेट इतर शेतकऱ्यांशी जोडण्यात येईल आणि याद्वारे त्यांना ‘शेतकरी-ते-शेतकरी’ (एफटूएफ) या जेफार्म सर्व्हिसेस अॅपमधून विनामूल्य सेवा घेता येईल. या अॅपमुळे ते शेतकरी उद्योजकांच्या संपर्कात येतील, भाड्याच्या दरांविषयी चर्चा करू शकतील आणि त्यांच्या गरजांची पूर्तता करू शकतील.

शेती क्षेत्रामध्ये आज ६५ टक्के भारतीय शेतकरी कार्यरत आहेत. भारतीय शेती क्षेत्राला जागतिक आणि अन्य बाजारपेठांची स्पर्धा आहे. २० कोटी भारतीय शेतकऱ्यांकडे पुरेशी यांत्रिक सामग्रीही नाही. याचा थेट परिणाम भारतातील ८६ टक्के लहान शेतकऱ्यांच्या शेती उत्पादनावर आणि शेतीतून येणाऱ्या उत्पन्नावर होतो.

लहान जमिनीचे तुकडे असणाऱ्या शेतकऱ्यांना आता सर्वोत्तम शेती साधने घेता येतील. यामुळे त्यांच्या उत्पादनावर चांगला परिणाम होणार आहे. जेफार्म सर्व्हिसेस अॅप आणि ट्रॅक्टर व इतर साधनांच्या मालकांकडून राबवले जाणारे प्रत्यक्ष कस्टम हायरिंग केंद्राद्वारे शेतकऱ्यांना परवडणाऱ्या किंमतीत शेतीसाठी लागणाऱ्या यंत्रसुविधा अतिशय पारदर्शक पद्धतीने पुरवल्या जाणार आहेत. जेफार्म सर्व्हिसेसला अतिशय कमी काळामध्ये चांगला प्रतिसाद लाभलेला आहे.

‘टीएएफई’च्या अध्यक्ष आणि सीईओ मल्लिका श्रीनिवासन म्हणाल्या, ‘जेफार्म सर्व्हिसेस हा शेतकी साधनांचा भाडेतत्त्व व्यासपीठ सीएसआर उपक्रम देशभर राबवण्यात आला आहे. जागतिक स्तरावर ‘टीएएफई’चा दृष्टीकोन राबवावा आणि भारतीय शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारावी यासाठी आम्ही वचनबद्ध असल्‍याने हा उपक्रम राबवण्यात आला आहे. या उद्घाटनासह आम्‍ही लाखो शेतकऱ्यांना शेतकी यंत्रणा आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान देण्याचा प्रयत्न करत आहोत. यामुळे पंतप्रधानांच्या २०२२ पर्यंत शेती उत्पन्नात दुप्पटीने वाढ करण्याच्या दृष्टीकोनासाठी प्रगती करता येणार आहे.’

‘टीएएफई’चे अध्यक्ष आणि सीओओ टी. आर. केसवन म्हणाले, ‘टीएएफईच्या जेफार्म सर्व्हिसेसद्वारे शेतकरी-ते-शेतकरी असे पारदर्शक व्यासपीठ सेवा दिली जाते. यामध्ये कोणत्याही प्रकारची छुपे शुल्क किंवा कमिशन नसल्यामुळे शेतकरी उद्योजकांना त्यांचे सध्याचे ट्रॅक्टर्स आणि इतर कोणत्याही ब्रँडची साधने इतर शेतकऱ्यांना भाडेतत्त्वावर देता येतात. चांगली साधने प्राप्त झाल्यामुळे हे शेतकरी त्यांच्या उत्पन्नात वाढ करू शकतात.’

जेफार्म सर्व्हिसेस अँड्रॉइड अॅपद्वारे शेतकरी सर्व साधने घेऊ शकतात किंवा टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधू शकतात. त्याचप्रमाणे स्थानिक कस्टम हायरिंग केंद्राशीही संपर्क साधू शकतात. हे अॅप कमी किंमतीच्या साध्या अँड्रॉइड फोनवर देखील वापरता येते. या व्यासपीठावरून हवामान, बाजारपेठा, शेतकी बातम्या आणि मंडीचे दर अशा स्थानिक बातम्या वेळोवेळी विनामूल्य दिल्या जातात.

टोल फ्री क्रमांक :
१८००-४-२००-१००
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link