Next
सरहद महाविद्यालयात पदवीग्रहण समारंभ उत्साहात
प्रेस रिलीज
Monday, February 18, 2019 | 10:48 AM
15 0 0
Share this story



पुणे : ‘आजच्या जागतिकीकरणाच्या काळात आरोग्य, कुटुंब आणि करिअर असा प्राधान्यक्रम ठेऊन सकारात्मक वाटचाल करावी आणि स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवावा,’ असे आवाहन नॅशनल इन्शुरन्स अॅकॅडमीच्या ‘पीजीडीएम’चे प्राचार्य डॉ. संजय माळी यांनी केले.

कात्रज येथील सरहद कॉलेज ऑफ आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स येथे पदवीग्रहण समारंभ नुकताच उत्साहात पार पडला. त्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या वेळी सरहद संस्थेच्या सचिव सुषमा नहार, संस्थेचे विश्वस्त शैलेश वाडेकर, सरहद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हनुमंतराव जाधवर, उपप्राचार्य डॉ. संगीता शिंदे, परीक्षा अधिकारी प्रा. सारिका ओहोळ यांसह सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते.



या वेळी बोलताना संस्थेचे विश्वस्त वाडेकर यांनी स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल, तर शिक्षणाबरोबर विविध कौशल्य विद्यार्थ्यांनी अंगी बाळगून चांगले उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवावे आणि त्यासाठी ध्येयवेडे व्हावे, असा सल्ला दिला, तर विद्यार्थ्यांनी सतत उद्योगी व क्रियाशील असले पाहिजे, असा उपदेश करून आयुष्यातील शिक्षणाचे महत्त्व ‘सरहद’चे प्राचार्य डॉ. जाधवर यांनी विशद केले.

महाविद्यालयाच्या एकूण ११८ विद्यार्थ्यांना पदवी देण्यात आली. डॉ. संगिता शिंदे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन डॉ. वंदना चव्हाण यांनी केले आणि प्रा. सारिका ओहोळ यांनी आभार मानले.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link