Next
रत्नागिरीत राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा
स्वामी स्वरूपानंद जयंतीनिमित्त गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात आयोजन
BOI
Thursday, December 06, 2018 | 12:20 PM
15 0 0
Share this story

स्वामी स्वरूपानंदरत्नागिरी : दर वर्षीप्रमाणे याही वर्षी स्वामी स्वरूपानंद यांच्या जयंतीनिमित्त पावस येथील स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ आणि गोगटे-जोगळेकर महाविद्यालय यांच्या वतीने राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा १५ डिसेंबर २०१८ रोजी आयोजित करण्यात आल्या आहेत. 

या स्पर्धा कनिष्ठ आणि वरिष्ठ अशा दोन गटांत होणार असून, स्पर्धेचे उद्घाटन सकाळी नऊ वाजता महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात होणार आहे. या स्पर्धेचे हे १५ वे वर्ष असून, दिवसभर चालणाऱ्या या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ त्याच दिवशी सायंकाळी पाच वाजता मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. 

कनिष्ठ गटासाठी ‘करी बुद्धीचा निश्चय, अंती सत्याचा विजय; स्वामी म्हणे सत्याचरण, देई आत्म-समाधान’ (संजीवनी गाथा; अभंग ८०), ‘आरक्षण : सद्यस्थिती व अपेक्षा’, ‘शब्दप्रभू गदिमा’ हे विषय आहेत. वरिष्ठ गटासाठी ‘ज्ञान हे चि जाण, कर्माचे लोचन; असावे संपूर्ण, निर्दोष ते’ (अभंग ज्ञानेश्वरी, ९-६७५), ‘नेमकी गरज कशाची? बुलेट ट्रेन्स की बेटर ट्रेन्स’, ‘मला झालेले ‘पुलं’ दर्शन’ हे विषय आहेत. 

दोन्ही गटातील विजेत्यांना वैयक्तिक रोख बक्षिसे, तसेच सांघिक भव्य चषक, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र, विजेत्या संघांच्या मार्गदर्शकास प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. सांघिक चषक जिंकण्याच्या दृष्टीने महाविद्यालयाचा दोनजणांचा संघ स्पर्धेला येणे गरजेचे आहे. राज्यातील तरुण पिढीची सांगड अध्यात्म, नैतिकता आणि समाजविकास या प्रश्नांशी घालावी या उद्देशाने स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाने या स्पर्धांचे आयोजन केले आहे. 

कार्यक्रमाला रत्नागिरीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी केले आहे. 
 
अधिक माहितीसाठी संपर्क : प्रा. दत्तात्रय वालावलकर- ९८२२१ ९०६६९
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link