Next
‘भारत बेंझ’तर्फे ‘बीएस ५’ व्यावसायिक वाहने उपलब्ध
प्रेस रिलीज
Monday, March 26, 2018 | 11:30 AM
15 0 0
Share this story

पुणे : व्यावसायिक वाहनांच्या क्षेत्रामधील एक विश्वसनीय नाव म्हणून ओळख असलेल्या ‘भारत बेंझ’तर्फे आता राज्यात ‘बीएस ५’ व्यावसायिक वाहने उपलब्ध करून देण्यात आली असून, घाटगे ट्रकिंग या ‘भारत बेंझ’च्या महाराष्ट्रातील प्रीमियर डीलरशिपतर्फे ताथवडे येथील शो रूममधून ‘बजाज ऑटो’ला या पहिल्या ‘बीएस ५’ वाहनाची डिलिव्हरी नुकतीच देण्यात आली.   

या वेळी ‘भारत बेंझ’चे विभाग व्यवस्थापक अनिल सिंग, ‘बजाज ऑटो’चे वाहतूक व्यवस्थापक दिलीप राव जगदाळे, बजाज ऑटोच्या संशोधन आणि विकास विभागाचे उपमहाव्यवस्थापक रमेश जोशी आदी उपस्थित होते.

‘बीएस ५ या व्यावसायिक वाहनांचा विचार केला, तर कमी उत्सर्जन आणि उच्च कार्यक्षमता यामध्ये ‘भारत बेंझ’ ही आघाडीची कंपनी असून, याच दोन कारणांमुळे ‘बीएस ५’ ही ‘भारत बेंझ’ची व्यावसायिक वाहने देखील आज ग्राहकांच्या पसंतीस उतरीत आहेत. याबरोबरच ‘बीएस ५’ तंत्रज्ञान हे उद्यासाठी स्वच्छ आणि पर्यावरणाच्या दृष्टीने अनुकूल तंत्रज्ञान असल्याने या वाहनांच्या राज्यातील उपलब्धतेबाबत आम्ही देखील आशावादी  आहोत,’ असे मत या वेळी घाटगे ट्रकिंगचे प्रमुख कार्यकारी अधिकारी कमल आचार्य यांनी व्यक्त केले.       

घाटगे ट्रकिंगच्या भविष्यातील विस्ताराबाबत आचार्य म्हणाले की, ‘व्यावसायिक वाहनांच्या व्यवसायाच्या विस्ताराबाबत आम्ही आशावादी असून, तो वाढविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. सध्या आम्ही पुणे, नाशिक, बारामती, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी आणि गोवा येथे कार्यरत असून, लवकरच अहमदनगर आणि लोणी काळभोर (पुणे) येथे विस्तार करण्याचा आमचा मानस आहे.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link