Next
‘आनंदाची निराळी वाट’ + ‘आयुष्यावर बोलू काही ज्येष्ठाधार’
BOI
Monday, August 05, 2019 | 11:06 AM
15 0 0
Share this article:

मन जर आनंदी, उत्साही आणि सकारात्मक ठेवले, तर आयुष्यही सुखी होते, असे सांगत दिगंबर मुळे यांनी ‘आनंदाची निराळी वाट’ या पुस्तकातून सुखी, आनंदी आयुष्यासाठी काय करावे हे स्पष्ट केले आहे. मनावर चांगले संस्कार करण्यासाठी संतांची शिकवण आचरणात आणणे, व्यक्तिमत्त्व विकासाचे महत्त्व, संकटातून बाहेर पडण्याचा विश्वास, विनय, नम्रता अंगी असणे, ध्येयनिश्चिती, नशिबावर हवाला ठेवण्यापेक्षा कष्ट, मेहनत करणे, अहंकार दूर सारणे, व्यसनांना जवळ न करता आरोग्यसंपन्न जीवन जगणे अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टींतून आनंदाची वाट शोधता येते.

संपन्न, समृद्ध आयुष्यात ज्येष्ठांचाही सहभाग असतो. त्यामुळेच लेखक मुळे यांनी त्यांच्या ‘आयुष्यावर बोलू काही ज्येष्ठाधार’ या दुसऱ्या पुस्तकामधून ज्येष्ठांच्या विषयावर विचार व्यक्त केले आहेत. नाती व स्मृती जपणे हा आनंददायी वृद्धापकाळाचा मंत्र असल्याचे सांगून आयुष्याच्या संध्याकाळी काय करायला हवे याबद्दलचे विचार लेखकाने मांडले आहेत. आदर्श आजी-आजोबांचा मार्ग, चिंतन-मनन करत मनःशांती मिळविणे, अशा अनेक विषयांद्वारे या पुस्तकातून ज्येष्ठांच्या समस्यांवर प्रकाश टाकण्यात आला आहे.

पुस्तके : ‘आनंदाची निराळी वाट’ आणि ‘आयुष्यावर बोलू काही ज्येष्ठाधार’
लेखक : दिगंबर मुळे
प्रकाशन : सुमंगल प्रकाशन
पृष्ठे : १६८
मूल्य : २०० रुपये

(‘आनंदाची निराळी वाट’ आणि ‘आयुष्यावर बोलू काही ज्येष्ठाधार’ या दोन पुस्तकांचा संच ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search