Ad will apear here
Next
अवंती दामले लिखित आणि बुकगंगा पब्लिकेशन्स, पुणे प्रकाशित ‘अलवार मनातलं’

परसातला पारिजातक फुलतो आणि दारात सुंदर असा गालिचा अंथरला जातो. मनाचे पण असेच काहीसे असते. अनेक व्यक्ती, त्यांच्या आठवणीजोडलेली नातीकाही ठिकाणं तर कधी काही वाचलेले हे सगळं काही मनात असतं आणि मनही स्वतःच्या व्याप्तीने सर्व काही सामावून घेत राहतं. अगदी नकळत अचानक मनाला धुमारे फुटू लागतात आणि मग कागदावर विचारांचा मनमोहक गालिचा अंथरला जातो. अलवारपणे आपण त्या आठवणींमध्येविचारांमध्येनात्यांमध्ये गुंफले जातो आणि सगळं काही मनातलं बाहेर पडतं.

 

अवंती दामले यांनी लिहिलेले आणि बुकगंगा पब्लिकेशन्सने प्रकाशित केलेले ‘अलवार मनातलं’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा १० जानेवारी २०२२ रोजी ‘रुट्स ९ किचन, राजा मंत्री पथ, पुणे’ येथे  पार पडला. प्रिंट पुस्तकाचे प्रकाशन आणि ई-बुकचे अनावरण लेखिका अवंती दामले यांच्या मुली आर्या आणि अनुष्का ह्या दोघींच्या हस्ते झालं.


 

या कार्यक्रमाला पुस्तकाच्या लेखिका अवंती दामले, बुकगंगा.कॉमच्या संचालिका गौरी जोशी व काही नामांकित डॉक्टर्स उपस्थित होते. प्रकाशन सोहळा पार पडल्यानंतर लेखिका अवंती दामले यांनी पुस्तकातील काही भाग वाचून दाखवला.

 

बुकगंगा.कॉम वरून अलवार मनातलंयाचे प्रिंट पुस्तक आणि ई-बुक विकत घेण्यासाठी खाली डीटेल्स दिलेले आहेत-


 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/SZUSDG
Similar Posts
बुकगंगा पब्लिकेशन्स पुणे प्रकाशित आणि पद्माकर पाठकजी लिखित ‘सुनहरे गीत’ या पुस्तकाचे प्रकाशन गाणी ऐकण्याच्या छंदाला अभ्यासाचे रूप देणे आणि त्यावर पुस्तक लिहिणे हे विशेष आहे...
सातमाईंचे रान ‘सातमाईंचे रान’ ही आयडा बॅरेटो यांनी लिहिलेली कादंबरी बुकगंगा पब्लिकेशन्सने प्रकाशित केली आहे. खोतांचे जागृत दैवत असलेल्या सातमाई हा कादंबरीचा विषय आहे. लेखिकेला आलेल्या अद्भुत अनुभवावर आधारलेल्या या कादंबरीत विविध मानवी भावभावनांचे, नातेसंबंधांचे चित्रण आले आहे. त्यातील काही अंश येथे प्रसिद्ध करत आहोत
'अल्लखचिन्हे' काव्यसंग्रहास उत्कृष्ट मुखपृष्ठासाठी द्वितीय पुरस्कार... बुकगंगा पब्लिकेशन्स, पुणे प्रकाशित आणि मेगमेहेन लिखित 'अल्लखचिन्हे' काव्यसंग्रहास अखिल भारतीय प्रकाशक संघाचा यावर्षीचा उत्कृष्ट मुखपृष्ठासाठी द्वितीय पुरस्कार जाहीर.
अत्यंत उत्कंठावर्धक, कॉर्पोरेट जगातील शह-प्रतिशह ह्यांची थरारक कहाणी सांगणारे पुस्तक 'गोमूचा नाच' आपले काम पार पडत असताना कामगार आणि मॅनेजमेंट दोघांचा फायदा व्हावा, लोकांमधला आत्मविश्वास वाढून त्यांना त्यांच्यातील कौशल्यांची जाणीव व्हावी, एक उमदे व्यक्तिमत्त्व घडावे म्हणून सातत्याने केलेले प्रयत्न. हा सगळा प्रवास, ह्या घडामोडी वाचणे अत्यंत रंजक आहे, विचारप्रवृत्त करणारे आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language