बुकगंगा पब्लिकेशन्स पुणे प्रकाशित आणि कवयित्री मीना साळुंके लिखित ‘चांदणकलिका’ या काव्यसंग्रहाचे दि. १३ ऑगस्ट २०२२ रोजी नेहरू मेमोरियल हॉल, कॅम्प, पुणे येथे प्रकाशन झाले.
या सोहळ्यास कॅम्प एज्युकेशन सोसायटी, पुणेचे कार्याध्यक्ष आणि उद्योजक श्री. वालचंदजी संचेती अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. त्यासोबत प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध कवयित्री आश्लेषा महाजन व इन्स्टिटयूट ऑफ सायन्स, पुणेच्या विश्वस्त आणि उद्योजिका डॉ. मधुरा प्रसाद जोशी उपस्थित होत्या. तसेच कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे डॉ. पूनावाला हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या दुर्गा देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे निवेदन शैला पाटील यांनी केले.
कार्यक्रमाची सुरुवात सर्व प्रमुख अतिथी यांच्या स्वागताने झाली. नंतर कवयित्री मीना साळुंके यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर चांदणकलिका काव्यसंग्रहातील काही निवडक कवितांचे वाचन कवयित्री मीना साळुंके आणि कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या काही माजी विद्यार्थ्यांनी केले.
यानंतर पुस्तक प्रकाशन आणि ई-बुक अनावरण सोहळा पार पडला.
प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध कवयित्री आश्लेषा महाजन यांनी काव्यसंग्रहाचे सविस्तर विवेचन केले. यासोबतच डॉ. मधुरा प्रसाद जोशी आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. वालचंदजी संचेती यांनी काव्यसंग्रहाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.
हे पुस्तक बुकगंगा डॉट कॉम वरून घरपोच मागवण्यासाठी तसेच त्याचे ई-बुक विकत घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा किंवा 8888 300 300 या क्रमांकावर व्हॉट्सअॅप करा.