Ad will apear here
Next
लेखिका स्मिता यांचे मूळ इंग्रजी पुस्तक Face IT चे बुकगंगा पब्लिकेशन्स, पुणे यांनी प्रकाशित केलेले आणि शुभदा विद्वंस यांनी भाषांतरित केलेले मराठी पुस्तक प्रकाशन सोहळा...

लेखिका स्मिता यांचे मूळ इंग्रजी पुस्तक Face IT चे बुकगंगा पब्लिकेशन्स, पुणे यांनी प्रकाशित केलेले आणि शुभदा विद्वंस यांनी भाषांतरित केलेले मराठी पुस्तक, याचा प्रकाशन सोहळा रविवार, २७ मार्च २०२२ रोजी पुण्याच्या सुमंत मुळगावकर ऑडीटोरीयम येथे पार पडला.

 

या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेते श्रीकांत यादव आले होते. तसेच पुस्तकाचे मुखपृष्ठ व पुस्तकातील सर्व स्केचेस तयार करणारे घनश्याम देशमुखलेखिका स्मिता डिंबर-रायकर आणि अनुवादिका शुभदा विद्वंस उपस्थित होते. कार्यक्रमाचे निवेदन नीरजा आपटे यांनी केले.

 

अभिनेते श्रीकांत यादव यांच्या हस्ते Face IT च्या प्रिंट पुस्तकाचे प्रकाशन आणि ई-बुक अनावरण झाले.


डावीकडून घनश्याम देशमुख, अभिनेते श्रीकांत यादव, अनुवादिका शुभदा विद्वंस आणि लेखिका स्मिता

 

लेखिका स्मिता यांनी आपले मूळ इंग्रजी पुस्तक Face IT ते त्याचा मराठी अनुवाद होण्यापर्यंतचा प्रवास आणि अनुभव व्यक्त केले. तसेच शुभदा विद्वंस आणि बुकगंगा पब्लिकेशन्सचे आभार मानले.


लेखिका स्मिता


अनुवादिका शुभदा विद्वंस यांनी लेखिका स्मिता यांच्या लिखाणाचे कौतुक केले. मूळ इंग्रजी लिखाण खूप सुंदर असल्यामुळे त्याचा मराठी अनुवाद करताना त्यांना खूप आनंद झाला असे त्या म्हणाल्या. बुकगंगा पब्लिकेशन्स आणि बुकगंगा.कॉमच्या संचालिका सुप्रिया लिमये यांचेही त्यांनी आभार मानले.


आपले अनुभव व्यक्त करताना अनुवादिका शुभदा विद्वंस

  

घनश्याम देशमुख यांनी मुखपृष्ठ आणि आतील स्केचेस काढण्यासंबंधीचा आपला अनुभव व्यक्त केला.


'बोलक्या रेषा' फेम घनश्याम देशमुख

 

त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अभिनेते श्रीकांत यादव यांच्यासोबत निवेदिका नीरजा आपटे आणि लेखिका स्मिता यांनी दिलखुलास गप्पा मारल्या. त्यात त्यांनी आपल्या कलाक्षेत्रातील कामाविषयी तसेच वेगवेगळ्या अनुभवाविषयी प्रेक्षकांशी संवाद साधला. शेवटी पुस्तकाचे कौतुक करून हे पुस्तक नक्की वाचा असे आनंदाने सांगितले.


प्रेक्षकांशी दिलखुलास गप्पा मारणारे अभिनेते श्रीकांत यादव

 

हे पुस्तक बुकगंगा डॉट कॉम वरून घरपोच मागवण्यासाठी तसेच त्याचे ई-बुक विकत घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा किंवा 8888 300 300 या क्रमांकावर व्हॉट्सअॅप करा.


 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/ZZMODI
Similar Posts
बुकगंगा पब्लिकेशन्स पुणे प्रकाशित आणि पद्माकर पाठकजी लिखित ‘सुनहरे गीत’ या पुस्तकाचे प्रकाशन गाणी ऐकण्याच्या छंदाला अभ्यासाचे रूप देणे आणि त्यावर पुस्तक लिहिणे हे विशेष आहे...
बुकगंगा पब्लिकेशन्स पुणे प्रकाशित आणि शर्मिला पटवर्धन लिखित कॅनव्हास ते वॉल या चित्रकार-शिल्पकार डॉ. पुष्पा द्रविड यांच्या चरित्रात्मक पुस्तकाचे प्रकाशन एक आई मुलांना जे संस्कार करून वाढवते, तेच मी पण केले. मी वेगळे असे विशेष काही केले नाही. मी माझे कर्तव्यच केले. माझ्या मुलांनी त्याचे चीज केले आणि मला नाव दिले...
बुकगंगा पब्लिकेशन्स, पुणे प्रकाशित आणि डॉ. माधवी वैद्य लिखित ‘कवी शब्दांचे ईश्वर.. असे साकारले कवी’ या पुस्तकाचे प्रकाशन मुखवटे नसणार्‍या चेहर्‍यांपर्यंत पोहोचणे अवघड : कवी-गीतकार वैभव जोशी यांचे प्रतिपादन... डॉ. माधवी वैद्य लिखित ‘कवी शब्दांचे ईश्वर.. असे साकारले कवी’ या पुस्तकाचे प्रकाशन... हे पुस्तक अभ्यासकांसाठी ऐतिहासिक दस्तावेज : डॉ. पी. डी. पाटील

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language