Ad will apear here
Next
‘डीकेटीई’ला ‘बेस्ट ट्रेनिंग अ‍ॅंड प्लेसमेंट’ पुरस्कार प्रदान
एलेट टेक्नोमीडिया इंडिया एज्युकेशन समिटमध्ये डॉ. रवी गुप्ता व डॉ. ए. अशोक यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना ‘डीकेटीई’चे प्रा. एस. आर. पाटील.

इचलकरंजी : येथील वस्त्रोद्योग आणि अभियांत्रिकी तसेच व्यवस्थापनशास्त्राचे अभ्यासक्रमाचे शिक्षण देणाऱ्या ‘डीकेटीई’ संस्थेला वर्ल्ड एज्युकेशन समिटमध्ये बेस्ट प्लेसमेंट अ‍ॅवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार ‘डीकेटीई’च्या वतीने एमबीए विभागप्रमुख प्रा. एस. आर. पाटील यांनी डॉ. रवी गुप्ता आणि कमिशनर डॉ. ए. अशोक यांच्या हस्ते स्वीकारला. 

मुंबई येथे झालेल्या एलेट टेक्नोमीडिया इंडिया लिमिटेड या जागतिक शैक्षणिक परिषदेत विविध महाविद्यालयांमधून नामांकित महाविद्यालयांची निवड करण्यात आली होती. इंजिनीअरिंगमधील विद्यार्थ्यांना प्लेसमेंट गुणवत्ता वाढीसाठी व उद्योजकता गुणांचे वाढ करून त्या विद्यार्थ्यांना कार्यक्षम बनविणे व तंत्रशिक्षणामधील विद्यार्थ्यांना नोकरी तसेच प्रशिक्षण देऊन विविध प्रोजेक्टवर कार्यरत करणे यासाठी हा पुरस्कार ‘डीकेटीई’ला देण्यात आला. 

२०१८-१९ या शैक्षणिक वर्षांत ‘एलियट टेक्नोमीडिया’ या कंपनीने सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणाअंतर्गत रिसर्च, कन्सल्टन्सी, प्रोजक्टवर्ग, इंडस्ट्रीयल ट्रेनिंग, इंडस्ट्री इंटरअ‍ॅक्शन, गर्व्हमेंट रिसर्च प्रोजेक्ट, इंडस्ट्री रिसर्च प्रोजेक्ट, कन्सलटन्सी राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय शैक्षणिक व इंडस्ट्रीसमवेतचे करार, प्लेसमेंट अशा विविध मुद्द्यांवर संस्थेची कामगिरी अभ्यासण्यात आली. या सर्व क्षेत्रांत ‘डीकेटीई’ची गुणवत्ता पाहून ‘बेस्ट ट्रेनिंग अ‍ॅंड प्लेसमेंट ऑपर्च्युनिटी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

या वेळी बोलताना कमिशनर डॉ. ए. अशोक म्हणाले, ‘जागतिक पातळीवर ‘डीकेटीई’सारख्या नामांकित संस्था आहेत की ज्यांनी कार्यक्षम असे प्लेसमेंट अ‍ॅंड ट्रेनिंग विभागामार्फत विद्यार्थ्यांना नोकरी व स्वव्यवसायाबददल योग्य ते प्रशिक्षण दिले जाते.’ या वेळी त्यांनी संस्थेचे डायरेक्टर प्रा. डॉ. पी. व्ही. कडोले यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.  

या समिटसाठी देशातील १००हून अधिक महाविद्यालयांचे ट्रेनिंग अ‍ॅंड प्लेसमेंट पदाधिकारी प्रतिनिधी उपस्थित होते. ‘डीकेटीई’ संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, ट्रेझरर आर. व्ही. केतकर, मानद सचिव डॉ. सपना आवाडे यांच्यासह सर्व ट्रस्टींनी या पुरस्काराबद्दल अभिनंदन केले.
 
Explore Local
My District - माझा जिल्हा
App available for download
Search for "Bytes of India" in Google Play & App Store
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language