Ad will apear here
Next
‘अॅटमगिरी’ उद्यापासून रूपेरी पडद्यावर
मुंबई : राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता हंसराज जगताप व ‘फँड्री’फेम राजेश्वरी खरात यांचा ‘अॅटमगिरी’ हा चित्रपट उद्या, नऊ जूनपासून प्रदर्शित होत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन प्रदीप टोणगे व मंगेश शेडगे यांनी केले आहे.

सुरुवातीपासूनच बहुचर्चित असलेल्या ‘अॅटमगिरी’ चित्रपटात राजश्री व हंसराज या दोघांची केमिस्ट्री भन्नाट जुळली आहे. त्याचबरोबर या चित्रपटात धनश्री मेश्राम, माननी दुर्गे, सुरज टक्के, शशी ठोसर, छाया कदम, अमित तावरे व मिलिंद शिंदे हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

किशोरवयीन प्रेमाचे चित्रण या चित्रपटात केले असून, एक वेगळी प्रेमकहाणी या चित्रपटातून रसिकांना अनुभवता येणार आहे.  एआरव्ही व अविराज प्रॉडक्शनची निर्मिती असलेल्या या चित्रपटाची निर्मिती विकास मुंदडा, अरविंद चांडक, राहुल बुब, अमित तावरे, प्रदीप बेलदरे, सचिन निगडे, संतोष कदम यांनी केली आहे. त्याचबरोबर इंद्रजित शिंदे हे सहनिर्माते आहेत. या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते अर्जुन शेवाळे आणि सचिन दुबाले पाटील असून, रामकुमार शेडगे हे प्रसिद्धीप्रमुख आहेत.  

चित्रपटातील गीते प्रदीप कांबळे, नीलेश कटके, गजानन पडोल, प्रदीप कांबळे यांनी लिहिली आहेत. या चित्रपटातील गीतांना पी. शंकरम् यांनी संगीत दिले असून, आर्या आंबेकर, पी. शंकरम्, आदर्श शिंदे, प्रेम कोतवाल यांचा स्वर गीतांना लाभला आहे. नऊ जूनला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language