Ad will apear here
Next
गडचिरोली जिल्ह्यात मोफत मदत केंद्राचे उद्घाटन


गडचिरोली : जिल्ह्यात समतादूतामार्फत ‘राइट टू एज्युकेशन’ (आरटीई) ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी मोफत मदत केंद्र सुरू करण्यात आले असून, या केंद्राचे उद्घाटन पाच मार्च २०१९ रोजी गोकुळनगर येथील अंगणवाडीत करण्यात आले.

या वेळी मीरा दरडमारे, अंगणवाडी सेविका मनीषा जुर्मेड यांच्यासह समतादूत वंदना धोंगडे, होमराज कवडो, संघरत्न कुंभारे व जयलाल सिंद्राम यांच्यासह पालक उपस्थित होते.

राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची संस्था असलेल्या पुण्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) समतादूत या विशेष प्रकल्पाच्या माध्यमातून समाजाचा शैक्षणिक व आर्थिक विकास करण्यासाठी हा प्रकल्प कार्यरत आहे. या प्रकल्पाद्वारे दुर्बल व वंचित घटकातील मुलांना ‘आरटीई’अंतर्गत इंग्रजी शाळेत प्रवेश मिळण्यासाठी प्रयत्न केला जातो. ‘आरटीई’अंतर्गत त्यांच्या मुलांना इंग्रजी माध्यमांच्या शाळेत मिळण्यासाठी डिसेंबर २०१८ ते फेब्रुवारी २०१९ या कालावधीत ‘बार्टी’च्या समतादूतांनी गडचिरोली जिल्ह्यातील झोपडपट्टी आणि दलित वस्त्यांमध्ये घरोघरी जाऊन गोरगरीब व अशिक्षित पालकांना याबाबत माहिती देऊन ८७० ऑफलाइन अर्ज भरले आहेत.

महासंचालक कैलास कनसे यांच्या मार्गदर्शनाखाली व मुख्य प्रकल्प संचालिका प्रज्ञा वाघमारे यांच्या आदेशानुसार गडचिरोली जिल्ह्यात समतादुतांमार्फत ‘आरटीई’ ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी मोफत मदत केंद्र सुरू करण्यात आले आहे. मनीष गणवीर यांनी समतादूतांना संपर्क करून मोफत अर्ज भरून घेण्याचे आवाहन या वेळी केले.

समतादुतांचे संपर्क क्रमांक :
सोनाप :
९४०४६ ४४३४८
कुंभारे : ९४२२९ ६२५३७
वकडो : ८५५४९ ३२१७५
सिंद्राम : ९४२११ ९९३५२
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language