Ad will apear here
Next
बीसीएसबीआयतर्फे ‘कोड ऑफ बँक्स २०१८’ सादर
मुंबई : बदलत्या बँकक्षेत्राच्या वातावरणात, ग्राहकांचे हक्क अबाधित राहतील, याची खात्री घेण्यासाठी बँकिंग कोड्स आणि स्टँडर्ड बोर्ड ऑफ इंडिया (बीसीएसबीआय)तर्फे नव्या ‘बँकांचे ग्राहकांसाठी देण्याचे वचन’ (कोड ऑफ बँक्स कमिटमेंट टू कस्टमर्स) सादर करण्यात आले आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय), इंडियन बँक्स असोसिएशन (आयबीए), असोसिएशन ऑफ डिपॉझिटर्स, सदस्य बँका आणि ग्राहक यांच्याशी संबंधित विभागांकडून हे कोड्स सादर करण्यात आले आहेत.

‘बँकिंग उद्योगक्षेत्रात अनेक बदल झालेले आहेत. डिजिटल इंडियासारख्या उपक्रमामुळे आपल्या देशात डिजिटल बँक सेवांचे प्रमाण वाढले आहे. ग्राहकांच्या बँकाबरोबरच्या संबंधांत कमालीचे परिवर्तन झाले आहे. हे लक्षात घेता, बँकेच्या ग्राहकांच्या हक्कांची सुरक्षितता राहावी यासाठी बदलत्या वातावरणानुसार कोड्सचे व्हर्जनही बदलण्यात येत आहे,’ असे बीसीएसबीआयचे अध्यक्ष ए. सी. महाजन यांनी सांगितले.

‘कोड ऑफ बँक्स कमिटमेंट टू कस्टमर्स’ची २०१८ची आवृत्ती ग्राहकांच्या डिजिटल व्यवहारांमध्ये सुरक्षितता राहावी यासाठी देण्यात आली आहे. बँका आणि ग्राहक सुरक्षित बँकसेवा स्वीकारत आहेत, विविध भागधारकांनी सर्व प्रकारची काळजी घेऊनही काही अधिकृत इलेक्ट्रॉनिक व्यवहार घडले आहेत. त्यामुळे या आवृत्तीत ‘डूज’ आणि ‘डोण्ट्स’ याची यादी समाविष्ट करण्यात आली आहे, यामुळे नव्या पिढीच्या बँक उत्पादनांचा अनुभव घेताना ग्राहकांनी सेफगार्ड असल्याची खात्री करून घेणे आवश्यक आहे.नव्या कोडमुळे अधिकृत इलेक्ट्रॉनिक व्यवहारांसाठी मर्यादित जबाबदाऱ्यांमध्ये ग्राहकांच्या व्यवहारांचे संरक्षण करण्यासाठी हे सेफगार्ड सादर करण्यात आले आहेत. डिजिटायझेशन, नव्या पेमेंट सेटलमेंट सिस्टम आणि कॅशलेस इकॉनॉमीवरील विश्वासही वाढत आहे.नव्या कोडमुळे बँकेच्या ग्राहकांच्या फायद्यांचे नियामक मार्गदर्शक तत्त्वांच्या आराखड्यांनुसार संरक्षण करण्यात येणार आहे’, असेही त्यांनी स्पष्ट केले.

‘सदस्य बँकांनी कुठल्याही अपवादाशिवाय अगदी तातडीने हे कोड्स स्वीकारावेत आणि त्याची अंमलबजावणी करावी, असे आवाहन महाजनी यांनी केले.
 
Explore Local
My District - माझा जिल्हा
App available for download
Search for "Bytes of India" in Google Play & App Store
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language