Ad will apear here
Next
या कातरवेळी
जन्म मृत्यूदरम्यानच्या जीवनातील सर्व अवस्थांपैकी वृद्धत्व ही काहीशी घाबरवून सोडणारी अवस्था असते; मात्र ती जीवनाची परिपूर्णताही असते, हे लक्षात घेऊन या अवस्थेला सामोरे जाण्याची ताकद प्रत्येकानेच मिळवायला हवी. वृद्धत्त्व हे असहाय्य न होता आनंदी कसे व्हावे, याचा विचार डॉ. अनिल गांधी यांनी या पुस्तकात केला आहे.

वृद्धत्त्वामध्ये शरीर आणि मनामध्ये वादळे उठतात. त्याचे वर्णन त्यांनी केले आहेच, शिवाय त्यावरील उपाय, ज्येष्ठांचे शारीरिक, मानसिक व भावनिक शोषण, ज्येष्ठांसाठीचे कायदे, ज्येष्ठांचे अर्थकारण, ज्येष्ठांना मदत करणाऱ्या संस्था, वृद्धाश्रमांची आवश्यकता आदींची माहितीही ते देतात. सुरुवातीपासूनचे भविष्याचे नियोजन करून वृद्धत्त्वाकडे वाटचाल केली, तर ही अवस्था सुलभ होते, असा संदेशही या लेखनातून मिळतो.

प्रकाशक : विश्‍वकर्मा प्रकाशन
पाने : २१६
किंमत : ३०० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language