Ad will apear here
Next
शकील बदायुनी
उर्दू भाषेतले मातब्बर शायर आणि गीतकार शकील बदायुनी यांचा तीन ऑगस्ट हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय....
........ 
तीन ऑगस्ट १९१६ रोजी आग्र्यामध्ये जन्मलेले शकील बदायुनी हे उर्दू भाषेतले मातब्बर शायर आणि गीतकार म्हणून प्रसिद्ध आहेत. पीरांसाठी आणि पेढ्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या त्यांच्या शहरात त्या काळी कवी लोकांचं इतकं पेव फुटलं होतं, की गमतीत असं म्हटलं जायचं, की तुम्ही तिथल्या शहराच्या कुठल्याही चौकात, कुठेही एक खडा भिरकावला, तर तो नक्की एखाद्या शायराच्या अंगाचा वेध घेईल! अशा माहौलमध्ये शकीलसुद्धा शायरी करायला लागले होते. अलीगढ मुस्लीम युनिव्हर्सिटीमध्ये शिकत असताना त्यांनी मुशायऱ्यांमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली आणि त्यांच्यातली चमक लोकांसमोर येत गेली. हिंदी सिनेमांत गीतं लिहिण्यासाठी ते मुंबईला आले आणि पहिल्याच ‘दर्द’ सिनेमातल्या ‘अफसाना लिख रही हूँ दिल ए बेकरार का’ या गाण्याने त्यांचं नाव झालं. त्या सिनेमाचे संगीतकार नौशाद यांच्याबरोबर त्यांचं खास ट्युनिंग जमत गेलं आणि पुढे जवळपास २५ वर्षं त्यांनी एकाहून एक हिट गाणी देऊन रसिकांना तृप्त केलं. साहीर, मजरूह, कैफी आझमी अशा खंद्या शायरांच्या स्पर्धेतही शकील यांनी आपलं अस्तित्व जपलं. आज की रात मेरे दिल की, आज मेरे मन मे सखी, आज पुरानी राहो से, ऐ हुस्न जरा जाग तुझे, बचपन की मोहब्बत को, बेकरार कर के हमे, भंवरा बडा नादान, भरी दुनिया में, भूलनेवाले याद न आ, चौदहवी का चाँद हो, दिल लगाकर हम ये समझे, दिल तोडनेवाले, इक शहेनशाह ने बनवा के, गुजरे है आज इश्कमे, हुस्नवाले तेरा जवाब नहीं, इक बार जरा फिर कह दो, कोई सागर दिल को, मधुबन में राधिका, मन तडपत, मेरे मेहबूब तुझे मेरी मोहब्बत की कसम, मेरी कहानी भूलनेवाले, मिली खाक में मोहब्बत, मोहे भूल गये, न मिलता गम तो, नसीब में जिस के जो लिखा था, सुहानी रात ढल चुकी, तेरे हुस्न की क्या तारीफ करू, तेरे प्यार में दिलदार, तेरे सदके बलम, तुमसे इझहारे हाल, उठाए जा उनके सितम, याद में तेरी जाग जाग के हम, ये कौन आया रौशन हो गयी, जरा नजरों से कह दो जी, जिंदगी कितनी खूबसूरत है, जिंदगी देनेवाले सुन - अशी त्यांची शेकडो गाणी आजही रसिकांच्या कानांत रुंजी घालत असतात. त्यांना तीन वेळा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. २० एप्रिल १९७० रोजी त्यांचं मुंबईत निधन झालं. 

(शकील बदायुनी यांनी लिहिलेल्या ‘हम भी अगर बच्चे होते...’ या गीताचा रसास्वाद घेणारा ‘सुनहरे गीत’ सदरातील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
......
यांचाही आज जन्मदिन :
डिटेक्टिव्ह कथा लिहून लोकप्रिय झालेली इंग्लिश लेखिका पी. डी. जेम्स (जन्म : तीन ऑगस्ट १९२०, मृत्यू : २७ नोव्हेंबर २०१४). या लेखिकेविषयी अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा. 
थोर संगीतकार जयदेव (जन्म:तीन ऑगस्ट १९१९, मृत्यू:सहा जानेवारी १९८७) 
नाट्य-चित्रपट कलाकर रमेश भाटकर 
हिंदीतील नामवंत कवी मैथिलीशरण गुप्त (जन्म : तीन ऑगस्ट १८८६, मृत्यू : १२ डिसेंबर १९६४) 
स्वातंत्र्योत्तर काळातले हिंदी चित्रपट अभिनेते मनहर देसाई (जन्म : तीन ऑगस्ट १९१७, मृत्यू : २५ फेब्रुवारी १९९२)
भारताच्या पहिल्या क्रिकेट विश्वचषक विजयात मोलाची कामगिरी करणारा बलविंदरसिंग संधू (जन्म : तीन ऑगस्ट १९५६) 
भारतासाठी सर्वाधिक गोल करणारा युवा फुटबॉलपटू सुनील छेत्री (जन्म : तीन ऑगस्ट १९८४) 

(‘बाइट्स ऑफ इंडिया’वर दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.) 
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language