Ad will apear here
Next
आगाशे विद्यामंदिरातील शारदोत्सवाची सांगता
नाट्यछटा स्पर्धा आणि सॅलड डेकोरेशन स्पर्धेच्या विजेत्यांचा गौरव
प्रकाश कदम यांचा सत्कार करताना विनायक हातखंबकर आणि मिलिंद कदम. शेजारी सौ. प्राजक्ता कदम, विजयालक्ष्मी देवरुखकर आणि सर्व शिक्षिका.

रत्नागिरी :
रत्नागिरीतील कृ. चिं. आगाशे विद्यामंदिरातील शारदोत्सवाची नुकतीच सांगता झाली. त्या वेळी पहिली ते चौथीमधील नाट्यछटा स्पर्धेतील विजेते आणि सॅलड डेकोरेशन स्पर्धेतील विजेते पालक यांचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाला शाळेचे प्रबंधक विनायक हातखंबकर, पटवर्धन हायस्कूलचे मुख्याध्यापक मिलिंद कदम, परशुरामपंत अभ्यंकर प्राथमिक विद्यामंदिरातील सहशिक्षक प्रकाश कदम, आगाशे विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका प्राजक्ता कदम, विजयालक्ष्मी देवरुखकर आदी उपस्थित होते. दत्तात्रेय नार्वेकर याने देवीची वेशभूषा केली होती. ज्येष्ठ शिक्षिका भारती खेडेकर यांनी स्वागत केले. शिक्षक सुधीर शिंदे यांनी सूत्रसंचालन केले.

लायन्स क्लबचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल शिक्षक प्रकाश कदम यांचा, भारत शिक्षण मंडळाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल प्राजक्ता प्रकाश कदम आणि मिलिंद कदम यांचा विशेष सत्कार शाळेतर्फे करण्यात आला. इयत्ता पहिली ते चौथीमधील विजेत्या चार नाट्यछटा विद्यार्थ्यांनी या वेळी सादर केल्या. मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

सत्कारानंतर प्रकाश कदम म्हणाले, ‘मी १९९६मध्ये अभ्यंकर प्राथमिक विद्यामंदिरात शिक्षक म्हणून रुजू झालो. त्या वेळी तेथील ज्येष्ठ शिक्षकांच्या मार्गदर्शनातून मुलांशी कसे वागले पाहिजे याची शिकवण मिळाली. आम्ही पहिली ते चौथीच्या मुलांना शिकवतो. एखादे मूल उशिरा आले तर त्याला लगेच ओरडू नये. त्याच्याकडून कारण जाणून घ्यावे. अशा संवादातूनच मुलांशी मैत्री होते. आमच्या घरीही शाळा सुरू असते. बाई येथे मुख्याध्यापिका असल्याने शाळेतील नियोजनाविषयी चर्चा होते. आपण नोकरी नाही तर सेवा बजावत आहोत, ही भावना त्यांच्या मनात असते. शाळेच्या उपक्रमातून मुलांना अभ्यासाव्यतिरिक्त आणखी काही मिळाले पाहिजे.’ 

‘आज सादर झालेल्या नाट्यछटा खूपच सुरेख होत्या. मुलांची शब्दफेक, विषयांची निवड चांगली होती,’ असे निरीक्षणही त्यांनी नोंदविले.

नाट्यछटा स्पर्धेचा निकाल : 
इयत्ता पहिली : इरा गोखले, सानवी बेहेरे, वेदा लिंगायत
दुसरी : शाल्व कारेकर, श्रावणी शिंदे, नभा बडे
तिसरी : हर्ष गिरकर, आश्लेषा काळे, आदित्य दामले
चौथी : सोहम आडिवरेकर, ऐश्वर्या तोंडलेकर, अंतरा पिलणकर. 

उत्तेजनार्थ बक्षिसे :
इयत्ता पहिली : श्रीनिवास भिसे, श्लोक जोशी.
दुसरी : श्रावणी पाटील, वेदान्त गोसावी
तिसरी : ईशा वायंगणकर, मृण्मयी पांचाळ
चौथी : प्रथम खेडेकर, अनिहा सुर्वे, आर्यन गुरव 

पालकांच्या सॅलड डेकोरेशन स्पर्धेतील विजेते :
प्रथम : आरती शिरगावकर 
द्वितीय (विभागून) : नेहा शिवलकर, साक्षी देसाई
तृतीय (विभागून) : मंजिरी गुणे, पूजा बनप
उत्तेजनार्थ : रिया नार्वेकर, प्रतीक्षा गिरकर, किशोर भुते.

(नाट्यछटांची झलक पाहण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language