Ad will apear here
Next
‘डिजी ठाणे’ प्रकल्प बैठक
डिजी ठाणे प्रकल्पांतर्गत व्यापाऱ्यांशी संवाद साधताना महापालिका आयुक्त संजीव जयस्वालठाणे : ‘डिजी ठाणे या प्रकल्पाच्या माध्यमातून प्रशासन ते नागरिक, व्यापारी ते नागरिक आणि नागरिक ते नागरिक अशा स्तरांवर काम चालणार असून या निमित्ताने हे सर्व घटक एकमेकांशी बांधले जाणार आहेत. नागरिकांना, तसेच उद्योजक आणि व्यापाऱ्यांनाही याचा फायदा होणार आहे,’ असे मत ठाण्याचे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी व्यक्त केले. 

ठाणे महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी डिजी ठाणे प्रकल्पांतर्गत २९ जुलै रोजी शहरातील व्यापारी संघटना, सुपर मार्केट चालक, ज्वेलर्स असोसिएशन, ठाणे रिटेल ट्रेड वेल्फेअर असोसिएशन, हॉटेल व्यावसायिक व फास्ट फूड व्यावसायिक यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत आयुक्त बोलत होते.

डिजी ठाणे हे या सर्व घटकांसाठी एक मोठे व्यासपीठ निर्माण होणार असून, याचा ठाणे शहराला फायदा होणार असल्याचे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी स्पष्ट केले.
 
Explore Local
My District - माझा जिल्हा
App available for download
Search for "Bytes of India" in Google Play & App Store
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language