Ad will apear here
Next
‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’च्या सेटवर प्लास्टिक बंदी
पर्यावरण रक्षणाच्या हेतूने मालिकेच्या टीमने उचलले पाऊल

मुंबई : ‘स्टार प्रवाह’वरील ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ मालिकेच्या टीमने पर्यावरण रक्षणाच्या हेतूने एक पाऊल पुढे टाकले आहे. निसर्गाची हानी करणाऱ्या प्लास्टिकचा वापर टाळण्याचा निर्णय या मालिकेच्या संपूर्ण टीमने घेतला असून, याचाच भाग म्हणून सेटवर वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या पाण्याच्या वापरावर बंदी करण्यात आली आहे. दशमी प्रॉडक्शन आणि कलाकारांनी या निर्णयाला पसंती दर्शवली आणि सेटवर स्टीलच्या बाटल्या दाखल झाल्या. प्रत्येक बाटलीवर कलाकार, दिग्दर्शक आणि इतर टीमची नाव देण्यात आली आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात प्लास्टिकला अटकाव झालाय.

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर... महामानवाची गौरवगाथा’ ही मालिका ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर सोमवार ते शनिवार या कालवधीत रात्री नऊ वाजता प्रसारित केली जाते. ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. 

या अनोख्या उपक्रमाविषयी सांगताना तुळसाची भूमिका साकारणारी अदिती द्रविड म्हणाली, ‘प्लास्टिकची समस्या किती गंभीर स्वरूपाची आहे हे आपल्या सर्वांनाचा माहित आहे. एक सुशिक्षित आणि सुजाण नागरिक म्हणून आपल्याला या गोष्टीची जाणीव असायलाच हवी. या बदलाच्या दृष्टीने सुरुवात होणे गरजेचे आहे. ही सुरुवात करण्याची प्रेरणा आम्हाला मिळाली याचा आनंद आहे. आम्हाला आमचे आणि आमच्या व्यक्तिरेखेचे नाव लिहिलेल्या बाटल्या दशमी प्रॉडक्शनकडून देण्यात आल्या आहेत. आमचा हा प्रयत्न इतरांनाही प्रेरणा देईल याची मला खात्री आहे.’ 

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ मालिकेमधून आंबेडकरांचे विचार जनमानसात पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु आहे. प्रत्यक्षातही चांगले बदल घडवण्यासाठी या मालिकेची संपूर्ण टीम सज्ज आहे. मालिकेत लवकरच रमा आणि भीवा यांचा विवाहसोहळाही पाहायला मिळणार आहे. 
 
Explore Local
My District - माझा जिल्हा
App available for download
Search for "Bytes of India" in Google Play & App Store
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language