Ad will apear here
Next
तीन लाखांपेक्षा कमी किंमतीतील ‘क्यूट’ अखेर दाखल
बजाजने आणली देशातील पहिली ‘क्वाड्रीसायकल’
बजाज ऑटोची क्वाड्रीसायकल ‘क्यूट’ दाखल करताना कंपनीच्या शहरांतर्गत वाहतूक व्यवसाय विभागाचे महाव्यवस्थापक नवनीत साहनी, उपमहाव्यवस्थापक प्रशांत अहिर, सर्व्हिस हेड अनुपम श्रीवास्तव.

पुणे : देशातील पहिले ‘क्वाड्रीसायकल’ वाहन ‘क्यूट’अखेर महाराष्ट्रातही दाखल झाले आहे. सहा वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर तीन लाखांपेक्षा कमी किंमतीतले हे अनोखे वाहन देशात दाखल करण्यात बजाज ऑटोला यश आले आहे. नुकतेच पुण्यात हे वाहन सादर करण्यात आले. या वेळी कंपनीच्या शहरांतर्गत वाहतूक व्यवसाय विभागाचे महाव्यवस्थापक नवनीत साहनी, उपमहाव्यवस्थापक प्रशांत अहिरे, सर्व्हिस हेड अनुपम श्रीवास्तव  उपस्थित होते.
 
बजाज ऑटोने २०१२ मध्ये हे वाहन सादर केले होते, मात्र भारतात नियामकाची परवानगी न मिळाल्याने त्याची देशात विक्री होत नव्हती. अखेर गेल्या वर्षी त्याची भारतात विक्री सुरू झाली. २२ राज्यांनी त्याला परवानगी दिली असली तरी, पहिल्या टप्प्यात केरळ, गुजरात, ओडिशा, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि महाराष्ट्रात हे वाहन दाखल करण्यात आले आहे. लवकरच देशाच्या ८० टक्के भागात हे वाहन पोहोचेल, अशी अपेक्षा कंपनीने व्यक्त केली आहे. 

२१६.६० सीसी क्षमतेचे फोर स्ट्रोक, सिंगल सिलिंडर इंजिन असलेल्या क्यूटला चार दरवाजे असून, मोबाईल चार्जिंग आदी सुविधा आहेत. पेट्रोल आणि सीएनजी अशा दोन्ही प्रकारात हे वाहन उपलब्ध आहे. प्रति तास ७० किमी अंतर कापण्याची क्षमता असलेल्या बजाज ऑटोच्या पेट्रोलवरील क्यूटची इंधनक्षमता ३५ किमी प्रति लिटर, तर सीएनजीवरील क्यूटची इंधनक्षमता ४३ किमी प्रति किलो आहे. पेट्रोल वाहन २.४८ लाख, तर सीएनजी वाहन २.७८ लाख रुपयांना राज्यात उपलब्ध असेल. सहा विविध रंगांमध्ये हे वाहन उपलब्ध आहे. कंपनीच्या औरंगाबाद येथून या वाहनाची निर्मिती होत असून, वर्षाला ६० हजार क्यूट उत्पादनक्षमता आहे. सध्या विविध ३० देशांमध्ये तिची निर्यात होते. 

शहरांतर्गत वाहतुकीसाठी हे अत्यंत उत्तम वाहन असून, वाहतूक समस्येवर चांगला पर्याय आहे. कार आणि रिक्षा यांच्यामधील हे वाहन आहे, असे कंपनीचे म्हणणे आहे. कंपनीचे उपमहाव्यवस्थापक प्रशांत अहिरे म्हणाले, ‘कंपनीचे लक्ष्य रिक्षाचालक वर्ग आहे. जे रिक्षापेक्षा चांगले वाहन घेऊ इच्छितात, पण टॅक्सी घेणे त्यांना परवडत नाही, अशांसाठी हा चांगला पर्याय आहे. त्याचप्रमाणे दररोज दुचाकीवरून ४० ते ५० किलोमीटर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठीही हे उपयुक्त ठरू शकेल. छोटे विक्रेते, व्यापारी, महिला व्यावसायिक यांच्यासाठीही हे वाहन उपयुक्त आहे.’
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language