Ad will apear here
Next
‘युवाशक्‍तीच देशविकासाची गुरूकिल्ली’
‘यशस्वी’ संस्थेच्या स्नेहसंमलनात आमदार मेधा कुलकर्णी यांचे प्रतिपादन

पुणे : ‘युवाशक्‍ती हीच देशविकासाची खरी गुरूकिल्ली असून यापुढे कौशल्य बळावर प्राविण्य मिळवणारे युवकच देशाच्या विकासात मोठ्या प्रमाणात योगदान देतील’, असे प्रतिपादन आमदार प्रा. मेधाताई कुलकर्णी यांनी केले. येथील ‘यशस्वी’ संस्थेतील मुलांच्या ‘यशोत्सव’ या स्नेहसंमेलन कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

‘यशस्वी’ संस्थेच्या स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी कार्यक्रमाला आमदार मेधा कुलकर्णी, ‘पुणे श्रमिक पत्रकार संघा’चे अध्यक्ष राजेंद्र पाटील, ‘यशस्‍वी’ संस्‍थेचे अध्‍यक्ष विश्‍वेश कुलकर्णी, संस्‍थेचे संचालक राजेश नागरे, डॉ. मिलिंद मराठे, अधिष्‍ठाता डॉ. राजेंद्र सबनीस, संचालक संजय छत्रे, संजय सिंग, मकरंद कुलकर्णी आदी उपस्थित होते.

याप्रसंगी आमदार मेधा कुलकर्णी व पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्‍यक्ष राजेंद्र पाटील यांच्या हस्‍ते ‘यशस्‍वी’ संस्‍थेच्‍या ‘यशोगाथा’ या चतुःमासिकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच ‘शिका व कमवा’ योजना आणि ‘नीम’ योजनेतून प्रशिक्षण पूर्ण केल्‍यानंतर विविध नामांकित कंपन्‍यांमधून रोजगाराची संधी प्राप्‍त झालेल्या काही विद्यार्थ्‍यांचा प्रशस्‍तीपत्र व सुवर्णपदक प्रदान करून सत्‍कार करण्‍यात आला. तसेच दिल्‍ली येथे नुकत्‍याच झालेल्‍या ‘नॅशनल कन्‍व्‍हेन्‍शन ऑन क्वालिटी कन्‍स्‍पेटस्’ या राष्‍ट्रीय स्‍पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून जपान येथे होणाऱ्या ‘इंटरनॅशनल कन्‍व्‍हेन्‍शन ऑन क्‍वालिटी कन्‍स्‍पेट्स’साठी निवडण्‍यात आलेल्‍या ‘प्रिकॉल लिमिटेड’ या कंपनीतील ‘यशस्‍वी’च्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांचाही या वेळी प्रशस्‍तीपत्र देऊन गौरव करण्‍यात आला. या वेळी संस्थेच्या विद्यार्थ्‍यांनी गायन, नृत्‍य, समूह नृत्‍य असे विविध कलाविष्‍कार सादर केले.

आमदार मेधा कुलकर्णी‘देशभरात सर्वत्र बेरोजगाराची समस्‍या चर्चिली जाता असताना, ‘यशस्‍वी’सारखी संस्‍था कौशल्‍य प्रशिक्षणाच्‍या माध्‍यमातून युवकांना थेट कंपन्‍यांमध्‍ये ‘ऑन द जॉब’ ट्रेनिंगची संधी उपलब्‍ध करून देत आहे आणि या रोजगारक्षम विद्यार्थ्‍यांना कंपन्‍यांमधून रोजगारसंधी उपलब्‍ध होत आहे. ही खरोखर कौतुकास्‍पद बाब आहे. ‘शिका व कमवा’ आणि ‘नीम’ या योजनांच्‍या माध्‍यमांतून कौशल्‍य प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या युवकांना नोकरीची संधी देण्‍यासाठी उद्योगजगताने घेतलेला पुढाकार हीसुद्धा उल्‍लेखनीय बाब आहे’, असेही मेधाताई या वेळी म्‍हणाल्‍या. 

पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र पाटीलपुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्‍यक्ष राजेंद्र पाटील यांनीही संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. ‘युवक-युवतींना कौशल्‍य विकास प्रशिक्षण देतानाच त्‍यांना स्‍टायपेंडद्वारे कमवण्‍याचीही संधी देणाऱ्या ‘यशस्‍वी’सारख्‍या संस्‍थांमुळेच स्‍वतःच्‍या पायावर उभे राहू शकणारे स्‍वावलंबी युवक घडत आहेत, ही अभिनंदनीय बाब आहे’, असे ते म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक संस्‍थेच्‍या मनुष्‍यबळ व्‍यवस्‍थापिका मुग्‍धा हुप्रीकर यांनी केले, तर संस्‍थेच्‍या संचालिका स्मिता धुमाळ यांनी आभार मानले. या वेळी संस्‍थेचे सर्व अध्‍यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप ‘सामूहिक राष्‍ट्रगीता’ने करण्‍यात आला.
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language