Ad will apear here
Next
डॉ. पतंगराव कदम राष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धा २२ फेब्रुवारीला
पुणे : ‘भारती अभिमत विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंटतर्फे (आयएमईडी)महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी डॉ. पतंगराव कदम राष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धा २२ फेब्रुवारी २०१९ रोजी आयोजित केली आहे. ‘आयएमईडी’च्या पौड रस्ता येथील कॅम्पसमध्ये ही स्पर्धा होणार आहे,’ अशी माहिती ‘आयएमईडी’चे संचालक आणि भारती विद्यापीठाच्या व्यवस्थापनशास्त्र शाखेचे अधिष्ठाता डॉ. सचिन वेर्णेकर यांनी दिली. स्पर्धेचे हे पाचवे वर्ष आहे.

‘डॉ. पतंगराव कदम- एक द्रष्टा नेता’, ‘भारताचे अर्थशास्त्र : समस्या आणि उपाय’, ‘धर्म आणि राजकारण’, ‘बेरोजगारीचा राक्षस’, ‘स्वच्छतेतून विकास’, ‘भारतीय शिक्षण पद्धतीसमोरील आव्हाने व उपाय’ असे विषय या वक्तृत्व स्पर्धेसाठी ठेवण्यात आले आहेत. प्रथम क्रमांक विजेत्याला दहा हजार रोख, द्वितीय क्रमांकासाठी सात हजार, तृतीय क्रमांकासाठी पाच हजार अशी पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. या शिवाय विजेत्यांना सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे.
 
Explore Local
My District - माझा जिल्हा
App available for download
Search for "Bytes of India" in Google Play & App Store
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language