Ad will apear here
Next
गणेशभक्तांकरिता मोफत वैद्यकीय सेवा
संचेती हॉस्पिटल आणि दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचा उपक्रम

पुणे : गणेशोत्सवाच्या काळात गणपती दर्शनासाठी आलेल्या भाविकांकरिता संचेती हॉस्पिटल आणि दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने मोफत वैद्यकीय सेवा उपक्रम राबविण्यात येत आहे. तत्काळ सेवेची गरज भासल्यास दोन अॅम्ब्युलन्स उपलब्ध करून देण्यात आल्या असून, आतापर्यंत या उपक्रमाद्वारे ३७०हून अधिक व्यक्तींना मदत मिळाली आहे. गणेश विसर्जनापर्यंत हा उपक्रम दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या मंदिराशेजारी सुरू राहणार आहे. 

गणेशोत्सवाच्या काळात होणाऱ्या प्रचंड गर्दीत एखाद्याला तातडीनं वैद्यकीय मदतीची गरज भासल्यास ती पुरविण्यासाठी संचेती हॉस्पिटलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. पराग संचेती यांच्या मार्गदर्शनाखाली संचेती हॉस्पिटलमधील डॉक्टरांची टीम मदतीकरिता सज्ज आहे. दर्शनासाठी आलेल्या गर्दीमध्ये अचानक थकवा येणे, सांधेदुखी, पायदुखी, मणका दुखणे, श्वा.स गुदमरणे, चक्कर येणे, रक्तदाब वाढणे, जखम अथवा दुखापत झाल्यास संचेती हॉस्पिटलतर्फे मोफत वैद्यकीय उपचार देण्यात येत आहेत.
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language