Ad will apear here
Next
‘एमसीई’तर्फे गांधी जयंतीनिमित्त अभिवादन मिरवणूक


पुणे : दीडशेव्या जयंतीनिमित्त महात्मा गांधींना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन (एमसीई) सोसायटीतर्फे गांधी जयंतीच्या पूर्वदिनी म्हणजेच एक ऑक्टोबरला अभिवादन मिरवणुकीचे आयोजन केले होते. यात ‘एमसीई’ सोसायटीतील अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थी, विद्यार्थिनी, प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी सहभागी झाले होते.  

‘एमसीई’ सोसायटी'चे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार यांनी मिरवणुकीचे उद्घाटन केले. सचिव लतीफ मगदूम यांनी मिरवणुकीचे नेतृत्व केले. एक ऑक्टोबरला सकाळी आठ वाजता आझम कॅंपस येथून मिरवणुकीला प्रारंभ झाला. या मिरवणुकीत पाच हजार विद्यार्थी, प्राध्यापक सहभागी झाले. शहराच्या प्रमुख रस्त्यांवरून फिरून मिरवणुकीचा समारोप आझम कॅंपस येथे झाला.

महात्मा गांधी यांच्या शांती, सत्याग्रह, सलोखा, सहकार, शिक्षण, जीवन विषयक तत्वज्ञानाच्या संदेशांचे फलक विद्यार्थ्यांनी हाती घेतले होते. या वेळी शेख मशकूर अहमद, अब्दुल वहाब शेख, डॉ. व्ही. एन. जगताप, प्रा. गफार शेख, प्रा. रबाब खान, प्रा. प्रवीण शेख, प्रा. आयेशा शेख, प्रा. गुलजार शेख, प्रा. मजीद सय्यद, प्रा. डॉ. किरण भिसे, प्रा. डॉ. अनिता बेलापूरकर आदी सहभागी झाले होते.

संस्थेतर्फे दर वर्षी छत्रपती शिवाजी महाराज, महंमद पैगंबर, डॉ. आंबेडकर, महात्मा फुले यांना अभिवादन करण्यासाठी मिरवणुका काढल्या जातात.
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language