Ad will apear here
Next
लोहगाव विमानतळावरील ‘कार्गो’चे स्थलांतर
पुणे : लोहगाव विमानतळावरील ‘कार्गो’ सेवा अर्थात मालवाहतुकीचे स्थलांतर सध्या मोकळ्या असलेल्या बरॅक स्टोअर ऑफिस यार्डाच्या (बीएसओ) जागेत करण्याचा महत्त्वाचा निर्णय विमानतळ विस्तारीकरणासंबंधी नुकत्याच झालेल्या उच्चपदस्थ बैठकीत घेण्यात आला आहे. यामुळे लोहगाव विमानतळाच्या नवीन टर्मिनलच्या बांधकामाचा मार्ग मोकळा होणार आहे.    

केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री आणि केंद्रीय पायाभूत सुविधा समितीचे अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या नवी दिल्ली येथील निवासस्थानी २६ डिसेंबर २०१८ रोजी ही बैठक झाली. या बैठकीला संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, दिलीप गांधी यांच्यासह संरक्षण मंत्रालय व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत लोहगाव विमानतळाच्या विकासासंबंधी चर्चा झाली. यात विमानतळावरील मालवाहतुकीचे स्थलांतर बीएसओ यार्डाच्या जागेत करण्यात यावे, असा पर्याय समोर आला. यामुळे विमानतळ विस्तारीकरणातील नवीन टर्मिनल इमारतीचे बांधकाम सोपे होणार आहे. विमानतळावरील मालवाहतुकीचे स्थलांतर विमानांच्या हँगर्सच्या मागे असलेल्या मोकळ्या जागेत करावे, अशीही मागणी असून, त्यासाठी औपचारिक प्रस्ताव पाठवून त्यावर निर्णय होणार आहे.  

विमानतळ परिसरातील ‘बीएसओ’ यार्ड आणि कमांडर वर्क्स इंजिनीअर ऑफिस (सीडब्ल्यूई) हे नवीन जागेत हलविण्यात यावे आणि त्यासाठी राज्य शासनाने हवाई दल व विमानतळ प्राधिकरणास जागा उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण व्हावी, अशी चर्चा या बैठकीत करण्यात आली. तोपर्यंत सध्या मोकळ्या असलेल्या ‘बीएसओ’ यार्डाच्या जागेत मालवाहतूक हलविण्यात येणार आहे.        

याविषयी बोलताना खासदार शिरोळे म्हणाले, ‘विमानतळ विस्तारीकरणाबरोबरच या बैठकीत चांदणी चौक उड्डाणपुलाविषयीही चर्चा झाली असून, त्यानुसार चांदणी चौक ते एनडीएकडे जाणाऱ्या रस्त्यावर प्रत्यक्ष काम सुरू करण्यासाठी मान्यता अर्थात ‘वर्किंग परमिशन’ देण्यात आली आहे. या उड्डाणपूल प्रकल्पासाठी राष्ट्रीय महामार्गाची जागा गृहीत धरून एकूण ३१.११ हेक्टर जागा लागणार आहे. यापैकी २९.१४ हेक्टर जागेचा ताबा प्राप्त झाला आहे. राष्ट्रीय महामार्गाची जागा विचारात न घेता १७.९१ हेक्टर क्षेत्रापैकी १५.९४ क्षेत्राचा ताबा प्राप्त झाला आहे. यातील चांदणी चौक ते एनडीएकडे जाणाऱ्या रस्त्यावर ०.४८ हेक्टर आर क्षेत्रावर प्रत्यक्ष काम करण्याची मान्यता आवश्यक होती. ती मान्यता संरक्षण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत देण्यात आली.’
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language