Ad will apear here
Next
‘बीएस्सी’साठीच्या ‘प्रात्यक्षिक भौतिकशास्त्र’ पुस्तकाचे प्रकाशन
सर्वच विज्ञान विषयांसाठी प्रात्यक्षिक पुस्तकांची गरज : प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के


कोल्हापूर :
‘विज्ञान शाखेतील सर्वच विषयांसाठी प्रात्यक्षिक पुस्तके बनविल्यास विद्यार्थ्यांसह शिक्षकांसाठीही ती उपयुक्त ठरतील,’ असा विश्वास शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी व्यक्त केला. 

शिवाजी विद्यापीठाच्या नवीन सीबीसीएस अभ्यासक्रमानुसार निश्चित केलेल्या प्रात्यक्षिकांसंदर्भात ‘बीएस्सी-भाग दोन’साठीच्या ‘प्रात्यक्षिक भौतिकशास्त्र’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. शिर्के यांच्या हस्ते नुकतेच झाले. त्या वेळी ते बोलत होते. डॉ. प्रशांत पाटील, डॉ. चिदानंद कनमाडी, डॉ. सचिन पवार आणि प्रा. विजय कोठावळे यांनी हे पुस्तक लिहिले आहे.

डॉ. शिर्के म्हणाले, ‘प्रात्यक्षिक भौतिकशास्त्र हे पुस्तक विद्यार्थ्यांना निश्चितच उपयुक्त ठरणार आहे. यामुळे सर्व महाविद्यालयांतील प्रात्यक्षिकांमध्ये समानता येईल. तसेच या पुस्तकामुळे विद्यार्थ्यांच्या मनातील प्रात्यक्षिकासंबधीची भीती दूर होईल. भौतिकशास्त्र विषयाच्या चार शिक्षकांनी एकत्रित केलेले हे कार्य निश्चितच अनुकरणीय आहे. या पुस्तकाप्रमाणेच प्रत्यक्ष प्रयोग करत असतानाच्या चित्रफिती तयार करून त्या विद्यापीठाच्या संकेतस्थळावर ठेवल्यास विद्यार्थ्यांना तेही अधिक फायद्याचे ठरेल.’

या वेळी विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. पी. एस. पाटील म्हणाले, ‘भौतिकशास्त्र विषयाच्या प्रात्यक्षिकांची कमतरता आणि वाढती विद्यार्थिसंख्या यामुळे विद्यार्थ्यांच्या आकलनाला मर्यादा येतात आणि हा विषय कठीण वाटू लागतो. ती अडचण या पुस्तकामुळे काही अंशी कमी होणार आहे. तसेच या पुस्तकाप्रमाणे भौतिकशास्त्र विषयाच्या प्रयोगासाठी आवश्यक उपकरणे स्वस्तामध्ये उपलब्ध करून देण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत.’ 

या वेळी उपकुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, तेजस प्रकाशनाचे रावसाहेब पुजारी उपस्थित होते. डॉ. प्रशांत पाटील यांनी कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक केले, तर डॉ. सचिन पवार यांनी आभार मानले.
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi