Ad will apear here
Next
हेमंत पाटील यांच्या प्रचारार्थ आमदार नागेश पाटील यांची सभा


हिमायतनगर :
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याकडे पाहून देशहितासाठी हिंगोलीतून शिवसेनेचे उमेदवार हेमंत पाटील यांना मतदान करा,’ असे आवाहन आमदार नागेश पाटील-आष्टीकर यांनी केले. हिंगोली लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार हेमंत पाटील यांच्या प्रचारार्थ हिमायतनगर शहरातील परमेश्वर मंदिर मैदानावर येथे नऊ एप्रिलला जाहीर सभा झाली. त्या वेळी ते बोलत होते.

व्यासपीठावर माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील, उमेदवार हेमंत पाटील, शिवसेना जिल्हाध्यक्ष कोकाटे, तालुकाध्यक्ष रामभाऊ ठाकरे, भाजप तालुकाध्यक्ष आशिष सकवान, नगराध्यक्ष कुणाल राठोडसह आदी मान्यवर उपस्थित होते. ‘काँग्रेसचे नेते विकासाच्या मुद्द्यावर मते मागण्याऐवजी वेगळे मुद्दे उपस्थित करत आहेत. त्यांच्याकडे विकासाचा मुद्दाच उरला नाही,’ असे आमदार पाटील म्हणाले. उमेदवार हेमंत पाटील म्हणाले, ‘मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. या निवडणुकीला मतदारांच्या पाठिंब्यावर उभा राहिलो आहे. गेल्या पाच वर्षांत खासदार किती वेळा या भागात आले, याचा शोध लावण्याची हीच वेळ आहे.’

सूर्यकांता पाटील म्हणाल्या, ‘ही निवडणूक म्हणजे देशातील सर्वोच्च सभागृहासाठीची निवडणूक आहे. देशाचे नेतृत्व करण्यासाठी नरेंद्र मोदी यांना पाठवायचे आहे. त्यासाठी सर्वांनी १८ एप्रिलला देशहितासाठी हेमंत पाटील यांना मतदान करून निवडून द्यावे.’या वेळी भाजपचे जिल्हा चिटणीस सुधाकर पाटील, शिवसेना तालुका संघटक संजय काईतवाड, विलास वानखेडे, यल्लप्पा गुंडेवार, विशाल राठोड, योगेश चिल्कावार, बंडूभाऊ अनगुलवार, खंडू चव्हाेण, भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष रामभाऊ सूर्यवंशी, शिवसेनेचे विधानसभा संघटक विजय वळसे, सत्यव्रत ढोले, रामचंद्र पाटील, राजू पाटील शेलोडेकर, किशनराव वानखेडे, प्रकाश जाधव, अरविंद पाटील सिरपल्लीकर, पवन करेवाड सिरंजनीकर, रवी पाटील टेंभीकर, सूरज दासेवार, संतोष पाटील, योगेश पवार, रवींद्र दमकोंद्वार, साईनाथ धोबे, आनंद कदम, मधुकर पांचाळ, ज्योती देशमुख, ज्योती बेदरकर, सुनंदा दासेवार, कौशल्याबाई, गौरव सूर्यवंशी, मंडलवाड, दमकोंडवार, मोतेवार, बालू ढोणे, गजानन पिंपळे यांच्यासह भाजप-शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी व महिला आघाडीचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language