Ad will apear here
Next
आयसीआयसीआय बँकेची ऑनलाइन ओव्हरड्राफ्ट सुविधा
मुंबई : ‘आयसीआयसीआय बँक’ या एकत्रित मालमत्तेच्या बाबतीत देशातील सर्वात मोठ्या खासगी बँकेने ‘एमएसएमई’ (मायक्रो, स्मॉल अँड मिडिअम एंटरप्रायजेस) ग्राहकांसाठी पूर्णतः ऑनलाइन व पेपरलेस पद्धतीने तातडीची ओव्हरड्राफ्ट सुविधा दाखल केल्याची घोषणा केली आहे. ‘इन्स्टाओडी’ असे नाव असलेल्या, भारतीय बँकिंग क्षेत्रातील अशा प्रकारच्या पहिल्यावहिल्या सुविधेमुळे बँकेच्या अगोदर पात्र ठरवण्यात आलेल्या, काही लाख खातेधारकांना शाखेत न जाताच व भौतिक स्वरूपातील कागदपत्रे सादर न करताच, या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.  
 
बँकेच्या इंटरनेट व मोबाइल बँक अॅपच्या मदतीने ग्राहकांना एका वर्षासाठी पंधरा लाख रुपयांचा ओव्हरड्राफ्ट केव्हाही, कोठूनही उपलब्ध होत असल्याने, ही सुविधा अतिशय सोयीची ठरते. अर्ज करण्याच्या प्रक्रियेमध्ये अधिक सुरक्षितता यावी, म्हणून या प्रक्रियेमध्ये आणखी एका स्तराच्या ऑथेंटिकेशनचा समावेश केला आहे. आयसीआयसीआय बँक अन्य बँकांच्या एमएसएमई ग्राहकांसाठीही लवकरच तातडीच्या ऑनलाइन मंजुरीची सुविधा उपलब्ध करणार आहे.
 
अनुप बागची, कार्यकारी संचालकया उपक्रमाविषयी बोलताना, आयसीआयसीआय बँकेचे कार्यकारी संचालक अनुप बागची म्हणाले, ‘आयसीआयसीआय बँकेमध्ये ‘रेडी फॉर यू, रेडी फॉर टुमारो’ ही आमची विचारसरणी आहे. त्यानुसार आम्ही आमच्या ग्राहकांना शक्य तितक्या वेगाने व अधिकाधिक सोयीने नावीन्यपूर्ण उत्पादने व सेवा देण्यासाठी प्रयत्नशील असतो. याच उद्देशाने ‘इन्स्टाओडी’ सुविधा सुरू करण्यात आली आहे. अशा पहिल्यावहिल्या सुविधेमुळे ग्राहकांना नवा अनुभव मिळणार आहे. भारतीय अर्थव्यवस्था प्रगती करत असताना, या सोयीच्या ओव्हरड्राफ्ट सुविधेमुळे एमएसएमई कंपन्यांना त्यांचा विस्तार सुलभपणे करणे शक्य होईल. ही सुविधा दाखल केल्यापासून काही दिवसांमध्येच आम्हाला भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. अन्य बँकांच्या एमएसएमई ग्राहकांसाठीही लवकरच तातडीच्या ऑनलाइन मंजुरीची सुविधा उपलब्ध करण्याचा आमचा विचार आहे.’
 
अर्ज करण्यासाठी ग्राहकांनी त्यांच्या ‘कॉर्पोरेट इंटरनेट बँकिंग’ (सीआयबी) खात्याद्वारे किंवा बिझनेससाठीच्या ‘आयबिझ मोबाइल अॅप्लिकेशन’द्वारे किंवा थेट बँकेच्या वेबसाइटवरून लॉगइन करावे, तेथे त्यांना ओव्हरड्राफ्ट सुविधा घेण्याचा पर्याय मिळेल. त्यांनी आवश्यक मर्यादा निवडावी, प्री-पॉप्युलेटेड पर्सनल इन्फर्मेशन पेजवरील तपशिलाची खातरजमा करावी व अर्ज सादर करावा. ओव्हरड्राफ्ट सुविधेच्या परतफेडीनुसार, ओव्हरड्राफ्ट सुविधेचे दरवर्षी नूतनीकरण करता येईल.
 
बँकेने कर्ज व गुंतवणूक क्षेत्रामध्ये डिजिटल सेवा देण्यासाठी हाती घेतलेल्या उपक्रमांच्या निमित्ताने ‘इन्स्टंटली’ हा उपक्रम राबवण्यात येत आहे. यामध्ये देशातील पहिले इन्स्टंट क्रेडिट कार्ड, प्रमुख पेमेंट सुविधांमार्फत कमी रकमेचे इन्स्टंट डिजिटल कर्ज व पब्लिक प्रॉव्हिडंट फंड खाते इन्स्टंट उघडणे समाविष्ट आहे. बँकेने एटीएमद्वारे वैयक्तिक कर्जांचे वितरण आणि नॅशनल पेन्शन स्कीमसाठी (एनपीएस) डिजिटल नोंदणी या सेवाही सुरू केल्या आहेत.
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi
Select Language