Ad will apear here
Next
‘रेनॉ इंडिया’चे व्यवसाय विस्तार करण्याचे धोरण
वेंकटराम ममीलपल्ले यांची व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती
रेनॉ इंडियाचे नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक वेंकटराम ममीलपल्ले

पुणे : जगातील चौथी सर्वात मोठी प्रवासी वाहन बाजारपेठ असलेल्या भारतीय बाजारपेठेत आपले स्थान अधिक बळकट करण्यासाठी ‘रेनॉ इंडिया’ सज्ज झाली असून, कंपनीने नवीन व्यावसायिक धोरणांची आखणी केली आहे. याचाच एक भाग म्हणून कंपनीने वेंकटराम ममीलपल्ले यांची देशातील नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती केली आहे. 

भारतीय वाहन बाजारपेठ २०१८मध्ये जर्मनीला मागे टाकत जगातील चौथी सर्वात मोठी बाजारपेठ बनली. २०२२ पर्यंत तिसरी सर्वात मोठी वाहन बाजारपेठ बनण्याचे ध्येय भारतीय बाजारपेठेने ठेवले आहे. त्यामुळे भारत ही रेनॉसाठी महत्त्वाची बाजारपेठ आहे. या बाजारपेठेत ‘रेनॉ इंडिया’ने गेल्यात वर्षी पाच लाख विक्रीचा टप्पा पार केला. हा यशस्वी टप्पा गाठत कंपनी भारतात सर्वात जलद वाढ साधणारी ऑटोमोबाइल ब्रॅंड बनली. आता कंपनी अधिक मोठा हिस्सा काबीज करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. याकरता नवीन उत्पादन दाखल करण्यात येणार असून, त्यात एसयूव्हीवर भर देण्यात येणार आहे. याकरता वेंकटराम ममीलपल्ले यांच्याकडे नेतृत्त्व देण्यात आले आहे. 

वेंकटराम ममीलपल्ले यांना वाहन क्षेत्रातील २८ वर्षांचा अनुभव असून, ते भारत व सार्क देशांतील रेनॉच्या कार्यसंचालनात नेतृत्वाची धुरा सांभाळतील. यापूर्वी वेकंटराम रशियातील रेनॉ-निस्सावन-एव्हटोव्हजचे प्रमुख होते. त्यांनी या कंपनीमध्ये परिवर्तन, वाढ आणि लाभासाठी लक्षणीय योगदान दिले. रेनॉ समुहामध्ये रुजू होण्यापूर्वी वेंकटराम यांनी विविध भारतीय व जागतिक ओईएममध्ये विविध आघाडीच्या पदांचा कार्यभार सांभाळला आहे. त्यांना भारतीय वाहन क्षेत्राचाही दांडगा अनुभव आहे. यामध्येर पुरवठा शृंखला व्ययवस्थापन, दर्जा, उत्पादन व लॉजिस्टिक्स या विभागांचा समावेश आहे. ज्यामुळे कंपनीला भारतात व्या‍पक विस्तारीकरण धोरणाची अंमलबजावणी करण्यामध्ये मदत होईल. 

‘रेनॉ इंडिया’मध्ये रुजू होण्याबाबत बोलताना वेंकटराम ममीलपल्ले म्हणाले, ‘सुरूवातीला मी कंपनीसाठी तीन उद्देश निश्चित केले आहेत. पहिला म्हणजे कंपनी सहयोगात्मक कामाच्या सर्व कंपन्यांसोबत सहयोगाने ‘एका ध्येयाशी संलग्न एक टीम’ म्हणून काम करेल. दुसरे म्हणजे सर्व व्यावसायिक क्षेत्रांमध्ये ‘ग्राहककेंद्री’ दृष्टीकोनाला प्राधान्य देणे. ज्यामुळे दर्जात्मक उत्पादने निर्माण करण्यामध्ये मदत होईल आणि अभियांत्रिकी, उत्पादन, पुरवठादार व विक्रेत्यांवरदेखील लक्ष केंद्रित करता येईल. तिसरा उद्देश म्हणजे पुढील तीन वर्षांमध्ये आमचा विक्री आवाका दुप्पट करत दीड लाख युनिट्सपर्यंत घेऊन जाणे.’

‘रेनॉ यंदा नवीन उत्पादनदेखील दाखल करणार आहे. एसयूव्ही हा रेनॉचा महत्त्वपूर्ण व भारतातील जलदगतीने विकसित होणारा विभाग असून, उत्पादन-संबंधी धोरण कंपनीची क्षमता वाढवण्यासाठी काम करेल;तसेच हे धोरण भारतीय वाहन क्षेत्रामध्ये नवीन विभाग व उपविभागांची निर्मिती करेल. भारतासाठी रेनॉची आगामी उत्पादने भारतातच डिझाइन आणि निर्माण केली जातील. रेनॉ वितरकांनादेखील फायदा होण्यावर लक्ष केंद्रित करेल. ज्या‍मुळे आवाका व ऑफरिंग्जमध्ये वाढ होऊन महसूल वाढवण्यास मदत होईल,’असेही त्यांनी सांगितले. 
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi
Select Language