Ad will apear here
Next
रत्नागिरीत जागतिक महासागर दिवस साजरा

रत्नागिरी : येथील रिलायन्स फाउंडेशन माहिती सेवा, कांदळवन संरक्षण व उपजीविका निर्माण योजना प्रकल्प व महाराष्ट्र वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरीत आज (आठ जून २०१९) जागतिक महासागर दिवस उत्साहात  साजरा करण्यात आला. 

प्रारंभी पावस येथील खाडीत कांदळवनाची (Mangrove) रोपे लावण्यात आली. या वेळी रिलायन्स फाउंडेशन रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक राजेश कांबळे यांनी उपस्थित मच्छिमारांना जागतिक महासागर दिवसाचे महत्त्व पटवून सांगितले. कांदळवन कक्षाच्या उपजीविका तज्ज्ञ मनाली राणे यांनी कांदळवन संरक्षण व उपजीविका निर्माण योजना प्रकल्पाची माहिती दिली. कांदळवन कक्षाच्या ऋतुजा ठोंबरे यांनी कांदळवन कक्षांच्या विविध योजना व त्याची सविस्तर माहिती मच्छिमारांना दिली. कांदळवन कक्षाचे चिन्मय दामले, स्वस्तिक गावडे व चंद्रशेखर खैरमोडे यांनी खेकडापालन, काकईपालन, पिंजऱ्यातील मत्स्यशेतीबद्दल माहिती दिली.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परशुराम मासेमार सोसायटीचे सदस्य व सागरी मच्छिमार संघटनेचे कार्यकर्ते संजय पावसकर यांनी केले. रिलायन्स फाउंडेशनचे विनोद गवाणकर यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. या कार्यक्रमासाठी परशुराम मासेमार सोसायटीचे सदस्यांचे विशेष सहकार्य लाभले. परशुराम मासेमार सोसायटीचे अध्यक्ष सूर्यकांत नाटेकर यांनी आभार मानले. या प्रसंगी मच्छिमार मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi