Ad will apear here
Next
‘रुबी हॉल क्लिनिक’तर्फे भाविकांसाठी वैद्यकीय मदत केंद्र
‘रूबी हॉल क्लिनिक’तर्फे दगडूशेठ गणपतीजवळ  वैद्यकीय मदत केंद्र स्थापन करण्यात आले आहे. येथे उपस्थित डॉ. संजय पठारे, अधिकारी अलंकार गोडबोले, अमित कांबळे, तुषार शिरसाठ, अमोघ पुजारी, डॉ. विवेक सावरीकर आदी.

पुणे : ‘रुबी हॉल क्लिनिक’तर्फे गणेशोत्सवाच्या काळात भाविकांना तातडीने वैद्यकीय मदत मिळावी या उद्देशाने दगडूशेठ गणपतीजवळ वैद्यकीय मदत केंद्र स्थापन करण्यात आले आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या सहकार्याने हा उपक्रम राबवण्यात येत असून, येथे भाविकांची वैद्यकीय तपासणीही करण्यात येत आहे. 

या केंद्रावर प्रशिक्षित डॉक्टर्स, परिचारिका आणि अॅम्ब्युलन्सची सुविधा आहे. या मदतकेंद्राद्वारे आतापर्यंत एक हजारहून अधिक भाविकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, मोफत औषधे देण्यात आली. या उपक्रमात रुबी हॉल क्लिनिकचे वैद्यकीय संचालक डॉ. संजय पठारे, अधिकारी अलंकार गोडबोले, अमित कांबळे, तुषार शिरसाठ, अमोघ पुजारी, श्रीहरी शिंदे, रामेश्वंर मगर, डॉ. विवेक सावरीकर, अलीम शेख, विनीत घनवट, सुनिल सांगळे आदींचा समावेश आहे. या निमित्ताने भविकांशी संवाद साधत अवयवदानाबाबत जागरूकता निर्माण करण्यात येत आहे.
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language