Ad will apear here
Next
‘लाभार्थ्यांच्या मतांचा आढावा घ्यावा’
केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांची सूचना
जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीच्या बैठकीत बोलताना केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर. या वेळी गिरीश बापट, सुप्रिया सुळे, मुक्ता टिळक, नवल किशोर राम आदी उपस्थित होते.

पुणे : ‘केंद्र व राज्य शासनाच्या योजनांच्या अंमलबजावणीनंतर झालेले परिणाम व लाभार्थ्यांची मते याचा आढावा घेण्यात यावा,’ अशी सूचना केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल आणि माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली. जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीच्या (दिशा) बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते.

या बैठकीस महापौर मुक्ता टिळक, खा. गिरीश बापट, खा. सुप्रिया सुळे, पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते, बारामती नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव, झोपडपट्टी पुर्नवसन प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाचे प्रकल्प संचालक संभाजी लांगोरे, तसेच विविध समन्वयन यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

‘पुणे जिल्हयात मुद्रा योजनेमधून १४५ मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले, त्याद्वारे जवळपास नऊ लाख युवकांना याचा लाभ मिळाला. याबाबतचा आढावा घेऊन जास्तीत जास्त मेळाव्यांचे आयोजन करण्यात यावे व त्या वेळी लोकप्रतिनिधींनाही आमंत्रित करावे, या योजनेची जास्तीत जास्त प्रसिध्दी करावी, तसेच केलेल्या कार्यवाहीचा अहवाल संबधितांना वेळोवेळी पाठवावा,’ असेही जावडेकर यांनी सांगितले. 


रेल्वे विभागामार्फत करण्यात आलेल्या नवीन सुविधांची त्यांनी माहिती घेतली. पुणे विभागामध्ये पाच नवीन स्वयंचलीत जिन्यांची उभारणी करण्यात आली असून, एकूण ४६ स्थानकांवर  वाय-फायची सुविधा देण्यात आली आहे. आणखी काही कामे प्रगतीपथावर आहेत. या कामांचा आढावाही त्यांनी घेतला.
या वेळी केंद्रीय मंत्री यांनी पासपोर्ट कार्यालये, पोस्ट आणि दूरसंचार विभागांचा आढावा घेऊन प्रलंबित कामांबाबत कार्यवाही करण्यात येऊन पुढील बैठकीमध्ये माहिती देण्याची सूचना केली. पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय आरोग्य अभियान, जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री मातृवंदना योजना, आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, आरोग्यवर्धिनी केंद्रे, शिक्षण विभागाकडील समग्र शिक्षांतर्गत ग्रंथालये व शालेय साहित्य वाटप इ.चा आढावा घेतला. स्वच्छ भारत मिशन, एकात्मिक बाल विकास सेवा योजना इ.योजनांचा आढावा घेवून आवश्यक सूचना केल्या.

केंद्र शासनाच्या वतीने ११ सप्टेंबर ते एक ऑक्टोंबर या कालावधीमध्ये जनजागृती व श्रमदान मोहिम, दोन ऑक्टोंबर रोजी गावातील प्लॅस्टीक कचरा गोळा करणे व ग्रामस्थांचे श्रमदान, तीन ते २७ ऑक्टोंबर दरम्यान गावातील गोळा झालेले प्लास्टीक कचऱ्याचे व्यवस्थापन करणे इ.बाबींवर चर्चा केली.

जलदूत बसला प्रकाश जावडेकर यांनी हिरवा झेंडा दाखवला. या वेळी खासदार सुप्रिया सुळे, गिरीश बापट आदी मान्यवर उपस्थित होते.

‘जलदूत’ला हिरवा झेंडा 

या बैठकीपूर्वी प्रकाश जावडेकर यांनी प्रादेशिक लोकसंपर्क ब्यूरोमार्फत आयोजित केंद्र शासनाच्या योजनांची माहिती देणारे फिरते प्रदर्शन असलेल्या, तसेच पाणी बचतीचा संदेश देणाऱ्या जलदूत बसला हिरवा झेंडा दाखविला. राज्याच्या आठ जिल्ह्यांमधून या जलदूत बसमार्फत जनजागृती करण्यात येणार आहे. या वेळी उपस्थितांना पाण्याची बचत, स्वच्छतेचे पालन व प्लॅस्टीकचा वापर न करण्याबाबत शपथ देण्यात आली. या वेळी खासदार सुप्रिया सुळे, गिरीश बापट आदी उपस्थित होते. 

 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi