Ad will apear here
Next
पुण्यात मित्र महोत्सवाचे आयोजन
कौशिकी चक्रवर्तीपुणे : येथील मित्र फाउंडेशच्या वतीने २४ व २५ नोव्हेंबर २०१८ रोजी मित्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कर्वेनगर डीपी रस्त्यावरील पंडित फार्म्स येथे दोन्ही दिवशी सायंकाळी ५.३० वाजल्यापासून हा कार्यक्रम होणार आहे.

या कार्यक्रमाविषयी अधिक माहिती देताना फाउंडेशनचे अध्यक्ष धनंजय गोखले म्हणाले, ‘दर वर्षीप्रमाणे याही वर्षी फाउंडेशनच्या माध्यमातून दर्जेदार शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम रसिक श्रोत्यांसाठी घेऊन आलो आहोत. यावर्षीचा मित्र महोत्सव हा दोन दिवसाचा असून, यात शास्त्रीय संगीताबरोबरच व्हायोलीन, सरोद या वाद्यांचा आनंदही रसिकांना घेता येणार आहे. महोत्सवाची सुरुवात २४ नोव्हेंबरला किराणा घराण्याचे सुप्रसिद्ध गायक आनंद भाटे यांच्या गायनाने होईल. त्यांना सुरोग कुंडलकर (संवादिनी), भरत कामत (तबला) हे साथसंगत करतील. यानंतर एन. राजम यांचे व्हायोलिन वादन होईल. त्यांना नंदिनी शंकर (व्हायोलिन), सौरभ कर्डीकर (तबला) हे साथसंगत करतील.

आनंद भाटे२५ नोव्हेंबरला प्रसिद्ध सरोदवादक अमजद अली खाँ यांचे सुपुत्र आणि सेनई बंगश घराण्याच्या सातव्या पिढीतील सरोदवादक अयान अली बंगश यांचे सरोदवादन होईल. त्यांना सत्यजित तळवलकर तबल्यावर साथसंगत करतील. महोत्सवाचा समारोप पतियाळा घराण्याच्या सुप्रसिद्ध गायिका कौशिकी चक्रवर्ती यांच्या सुमधुर गायानाने होईल. त्यांना तन्मय देवचक्के (संवादिनी) आणि सत्यजित तळवलकर (तबला) साथसंगत करतील.

एन. राजमयाबरोबरच फाउंडेशनतर्फे २००५ सालापासून वयोवृद्ध गुरुजनांना गौरव निधी दिला जातो. यावर्षी प्रसिद्ध शास्त्रीय गायिका कुसुमताई सोहनी यांना महोत्सावाच्या पहिल्या दिवशी एन. राजम यांच्या हस्ते हा गौरव निधी प्रदान केला जाईल. आतापर्यंत ५५ जणांना हा गौरव निधी देण्यात आला असून, ११ हजार रुपये असे याचे स्वरूप आहे.

अयान अली बंगश‘महोत्सवासाठी रुपये १०० इतके सिझन तिकीट (दोन्ही दिवसांसाठीचे) ठेवण्यात आले असून सोमवार १९ नोव्हेंबर पासून पंडित फार्म्स, नावडीकर म्युझिकल्स, कोथरूड, शिरीष ट्रेडर्स, कमला नेहरू पार्क या ठिकाणी ती उपलब्ध होणार आहेत,’ असे गोखले यांनी सांगितले.

महोत्सवाविषयी :
कालावधी :
२४ व २५ नोव्हेंबर २०१८
वेळ : सायंकाळी ५.३० वाजता
स्थळ : पंडित फार्म्स, डीपी रस्ता, कर्वेनगर, पुणे.
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi
Select Language