Ad will apear here
Next
‘केशायुर्वेद’तर्फे आंतरराष्ट्रीय परिसंवाद
पुणे : भारतातील पहिले आयुर्वेदीय हेअर टेस्टिंग लॅब अँड रिसर्च सेंटर असलेल्या केशायुर्वेद आणि बीव्हीजी इंडियातर्फे आयुर्वेदावरील पहिल्या आंतरराष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या परिसंवादाचे उद्घाटन पाच जानेवारी हंगेरीतील भारतीय दूतावास डॉ. अस्मिता वेले यांच्या हस्ते होईल.

डॉ. अस्मिता वेलेया वेळी डॉ. वेले ‘आंतरराष्ट्रीय स्तवरावर आयुर्वेद’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. विविध देशात आयुर्वेदाचा प्रसार करणाऱ्या वैद्यांकडून या परिसंवादात मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यामध्ये ‘युरोप व जपानमधील आयुर्वेदाला असणाऱ्या संधी’ या विषयावर डॉ. सुकुमार देशमुख, ‘दुबईमधील आयुर्वेदाला असणाऱ्या संधी’ या विषयावर डॉ. अस्मा इनामदार, ‘जर्मनीमधील आयुर्वेदाला असणाऱ्या संधी’ या विषयावर डॉ. प्रियांका चोरगे, तर ‘रशियातील आयुर्वेदाला असणाऱ्या संधी’ या विषयावर डॉ. हरीश पाटणकर बोलणार आहेत.

मंदार जोगळेकर‘बुकगंगा डॉट कॉम’चे सीईओ मंदार जोगळेकर यांची यावेळी विशेष उपस्थिती असणार आहे.

परिसंवादाविषयी :
दिवस : शुक्रवार, पाच जानेवारी २०१८
वेळ : सकाळी नऊ वाजता
स्थळ : सुमंत मुळगावकर सभागृह, मराठा चेम्बर ऑफ कॉमर्स, सेनापती बापट रस्ता, पुणे.
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language