Ad will apear here
Next
सूर्यदत्त जीवनगौरव पुरस्कार जाहीर
पुणे : सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटतर्फे गेली १५ वर्षे दिले जाणारे ‘सूर्यदत्त जीवनगौरव पुरस्कार’ नुकतेच जाहीर करण्यात आले. ‘सूर्यदत्त’मध्ये शिकविल्या जाणाऱ्या फॅशन डिझाईन, इंटेरिअर डिझाईन, ब्युटी आणि वेलनेस, हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, स्पोर्ट्स आणि फिटनेस, बिझनेस मॅनेजमेंट, हेल्थ सायन्स, सोशल सायन्स, पब्लिक सर्व्हिस, सायन्स आणि टेक्नोलॉजी, ब्रेव्हरी आदी क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना सूर्यदत्त जीवनगौरव तसेच सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केले जातात.  

या पुरस्कारांविषयीचा मुख्य उद्देश सांगताना सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक संचालक व अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया, ‘विविध क्षेत्रात अतुलनीय कामगिरी केलेल्या तज्ञांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन विद्यार्थी व शिक्षक आपल्या यशासाठी ध्येय आणि उद्दिष्ट निश्चित करू शकतील. संस्थेतील विविध अभ्यासक्रमांचे प्रमुख विषय विचारांत घेऊन त्या त्या क्षेत्रांतील तज्ञ या पुरस्काराच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील आणि त्यामुळे भारताच्या नवनिर्मितीसाठी नवयुवकांचा हातभार लागेल. भारताच्या युवाशक्तीला प्रेरणा आणि योग्य दिशा मिळावी या मुख्य उद्देशातून ‘सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट’ सातत्याने अशा कार्यक्रमांचे आयोजन करत असते.’

‘सूर्यदत्त’च्या विसाव्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून जाहीर झालेले पुरस्कार असे : सूर्यदत्त जीवनगौरव पुरस्कार- सुधांशूजी महाराज (आधुनिक भारताचे संत), (कै.) हिराभाई शाह (समाजभूषण- कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलीटी, रामदास फुटाणे (वाङ्मय आणि काव्य), मुकेश खन्ना (दूरदर्शन कलावंत), गोविंद नामदेव (भारतीय सिनेसृष्टीतील चरित्र अभिनेता), डॉ. कल्याण गंगवाल (समाजात शांतता आणि एकोपा राखण्यासाठी केलेले कार्य तसेच महत्त्वपूर्ण योगदान), सुनील पारेख (प्रेरणादायी प्रशिक्षण), मुरली लाहोटी (संकल्पित कला).

सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार- भानुप्रताप बर्गे (शौर्य), अशोक शीलवंत (सामाजिक कार्य), डॉ. जयश्री तोडकर (वैद्यकीय शास्त्रातील संशोधन), पोपटराव पवार (ग्रामीण सुधारणा), डॉ. अविनाश पोळ (वैद्यकीय सामाजिक सेवा), ग्रेसी सिंग (हिंदी चित्रपट नायिका), उस्ताद इर्शाद खान (भारतीय शास्त्रीय संगीत आणि वादन), टेरेन्स लेविस (नृत्य आणि कला दिग्दर्शन), मृणाल कुलकर्णी (अभिनय, दिग्दर्शन आणि सिनेकलावंत), श्वेता जुमानी (संख्याशास्त्र), अॅड. हितेश जैन (कायदा आणि सुव्यवस्था), ललिता बाबर (क्रीडा), डॉ. गंगाधर मम्हाणे (शैक्षणिक सामाजिक कार्य)

सूर्यदत्त युवा पुरस्कार- प्रांजल जैन गुंदेशा (उद्योजकता आणि शालेय शिक्षणातील नाविन्यपूर्णता), पार्थ बन्सल (विज्ञान आणि तंत्रज्ञान). ‘सुर्यदत्त’च्या २०व्या स्थापनादिनी म्हणजेच सात फेब्रुवारीला हा पुरस्कार सोहळा होणार आहे. या समारंभाला आसामचे राज्यपाल जगदीश मुखी हे प्रमुख पाहुणे म्हणून, तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विनोद शहा उपस्थित राहणार आहेत. सुधांशूजी महाराज हे या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आहेत.

पुरस्कार वितरणाविषयी :
दिवस : सात फेब्रुवारी २०१८
वेळ : सायंकाळी पाच वाजता
स्थळ : सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे प्रांगण, पाटीलनगर, बावधन, पुणे.
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language