Ad will apear here
Next
ग्लेनमार्कला मधुमेहावरील नवीन औषधाला मंजुरी
पुणे : ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लिमिटेडला (ग्लेनमार्क)  पेटंट संरक्षित आणि जागतिक पातळीवर संशोधन केलेल्या रेमोग्लिफ्लोझिन आणि मेटफॉर्मिन फिल्म कोटेड गोळ्यांच्या संयुगांसाठी नियामकांची मान्यता मिळाली असून, सोडियम ग्लुकोज को-ट्रान्सपोर्टर-दोन (एसजीएलटी२), इन्हिबिटर रेमोग्लिफ्लोझिन एटाबोनेट (रेमोग्लिफ्लोझिन) आणि मेटफॉर्मिन हायड्रोक्लोराइड (मेटफॉर्मिन) फिल्म कोटेड गोळ्या भारतात आणण्याची परवानगी मिळाली आहे. हे औषध प्रौढांमध्ये टाइप दोन प्रकारच्या मधुमेहावरील उपचारांसाठी सुचवले जाते. ‘रेमो-एम’ आणि ‘रेमोझेन-एम’ या नावाने ही औषधे बाजारात आणली जाणार आहेत.  

‘ग्लेनमार्क ही भारतातील मधुमेही रूग्णांना अद्ययावत उपचार पर्याय देण्यातील आघाडीची कंपनी आहे. रेमोग्लिफ्लोझिन आणि मेटफॉर्मिन यांच्या संयुगासाठीची मान्यता ही भारतात मधुमेह व्यवस्थापनाची क्रांती करण्याप्रति आमच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. मधुमेहाचा प्रसार वेगाने वाढू लागल्यामुळे रूग्णांना प्रभावी उपचार पर्याय देताना खूप आनंद होत आहे,’ असे मत ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्सचे इंडिया फॉर्म्युलेशन्स, मध्यपूर्व आणि आफ्रिकेतील अध्यक्ष सुजेश वासुदेवन यांनी व्यक्त केले. 
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language