Ad will apear here
Next
बँकांचे शेअर्स वधारण्याची शक्यता

शेअर बाजारात सध्या मंदीचे वातावरण असले, तरी अर्थमंत्री निर्मला सीतारामन विदेशी गुंतवणूकदारांची एक बैठक घेणार आहेत. या बातमीने शुक्रवारी शेअर बाजार वधारला. बँकांचे शेअर्सही आता वर जाण्याची शक्यता आहे. बँकिंग क्षेत्रातील आणि अन्य क्षेत्रांतील गुंतवणूकयोग्य शेअर्सबाबत जाणून घेऊ या समृद्धीची वाट या सदरात ...
.....
अर्थमंत्री निर्मला सीतारामन विदेशी गुंतवणूकदारांची एक बैठक घेणार आहेत. या बातमीने शुक्रवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स शुक्रवारी (नऊ ऑगस्ट) २५४ अंकांनी वर जाऊन ३७ हजार ५८१वर स्थिरावला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीही ४४ अंकांनी वधारून ११ हजार १०९पर्यंत वाढला आहे. 

पुण्यात मेट्रोची कामे करीत असलेल्या जे. कुमार इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअरचा भाव शुक्रवारी १३० रुपये होता. बाजारात त्या दिवशी ७३ हजार शेअर्सचे व्यवहार झाले. सध्याच्या भावाला किं/उ गुणोत्तर साडेपाचपट इतके आकर्षक आहे. गेल्या बारा महिन्यातील याचा उच्चांकी भाव २७५ रुपये होता. इथे गुंतवणूक जरूर करावी. 

बजाज फायनान्स कंपनीचा शेअरही गेल्या आठवड्यात तीन हजार ४१८ रुपयांपर्यंत पोचला. शुक्रवारी त्यात ८२ रुपयांची वाढ होती. मार्च २०२०पर्यंत म्हणजे पुढील सात महिन्यांत तो चार हजार रुपयांपर्यंत वर जावा. हा शेअर एक सदाबहार वृक्ष असल्यामुळे पुढील अडीच, तीन वर्षे त्यात जरूर गुंतवणूक  करावी. बिगर बँकिंग फायनान्स क्षेत्रातील ही अग्रगण्य कंपनी आहे. 

येस बँकेचा शेअर ८२ ते ८३ रुपयांना उपलब्ध आहे. ज्यांना थोडी जोखीम घ्यायची सवय आहे, त्यांनी यात गुंतवणूक केल्यास वर्षात ४० टक्के नफा सहज मिळेल. बँकेने काही क्वालिफाइड इन्स्टिट्यूशनल गुंतवणूकदारांसाठी साडेअठ्ठावीस  कोटी डॉलर्सची रक्कम उभारायचे ठरवले आहे. विक्रीसाठी ८७९० रुपयांचा भाव ठरवला गेला आहे. याचाच अर्थ घाऊक गुंतवणूकदाराला या शेअरचा भाव नजीकच्या भविष्यात १० ते १५ टक्के वाढावा, असे वाटत असेल. 

बांधकाम क्षेत्रातील दिलीप बिल्डकॉन कंपनीचा शेअर ४०० रुपयांच्या आसपास उपलब्ध आहे. वर्षभरातील या शेअरचा उच्चांकी भाव ८८८ रुपये होता. इथेही गुंतवणूक जरूर करावी. मॅक्स फिनान्शिअल सर्व्हिसेसचा शेअर सध्या ६०० रुपयांना उपलब्ध आहे; मात्र त्यात शेअर्सचे तुरळक व्यवहार होतात. त्यामुळे गुंतवणूकदारांना अपेक्षित भाव मिळवण्यासाठी बरेच थांबावे लागेल. 

अर्थमंत्र्यांच्या विदेशी गुंतवणूकदारांबरोबर होणाऱ्या बैठकीकडे शेअर बाजार अपेक्षेने बघत आहे. या बैठकीनंतर बँकांचे शेअर्स वर जावेत. बँक ऑफ महाराष्ट्रचा शेअर सध्या १२ रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. इथून तो आणखी १५ टक्के वाढू शकेल. पिरामल एंटरप्राइझेसचा जून २०१९ तिमाहीचा नफा ४५०.८९ कोटी रुपये झाला. गेल्या बारा महिन्यांतील या शेअरचा उच्चांकी भाव तीन हजार ३०७ रुपये होता. तो लक्षात घेता वर्षभरात सध्याच्या भावात किमान ३० टक्के वाढ व्हायला हरकत नाही. 

टायर क्षेत्रातील अपोलो टायर्स आणि बाळकृष्ण इंडस्ट्रीज हे शेअर घेण्याजोगे आहेत. गेल्या आठवड्यात अपोलो टायर्सच्या  शेअरमध्ये १० टक्के वाढ झाली. रोज ४० ते ५० लक्ष शेअर्सचा व्यवहार होतो. 

वर परामर्श घेतलेल्या पाच-सहा शेअर्समध्ये गुंतवणूक फलदायी ठरणार असली, तरी राजकीय आणि नैसर्गिक परिस्थिती अंदाज बदलू शकते. जम्मू-काश्मीर केंद्रशासित केल्याचा शेअर बाजारावर विपरीत परिणाम झालेला नाही.


- डॉ. वसंत पटवर्धन   
(लेखक शेअर बाजार या विषयातील तज्ज्ञ आणि ‘बँक ऑफ महाराष्ट्र’चे माजी अध्यक्ष आहेत.)

(शेअर बाजार, तसेच म्युच्युअल फंडातील गुंतवणूक जोखीमपूर्ण आहे. ‘समृद्धीची वाट’ या सदराचा उद्देश वाचकांना गुंतवणुकीसंदर्भातील अशा विविध बाबींची माहिती करून देऊन दिशा दाखवणे हा आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना वाचकांनी स्वतःच्या जबाबदारीवरच करावी. त्यासाठी ‘बाइट्स ऑफ इंडिया’ कोणत्याही प्रकारे जबाबदार नसेल. वाचकांनी गुंतवणुकीसंदर्भातील आपल्या शंका, प्रश्न article@bytesofindia.com या ई-मेलवर पाठवावेत. निवडक प्रश्नांना या सदरातून उत्तरे दिली जातील. हे सदर दर रविवारी प्रसिद्ध होते. त्यातील लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Vb1kM6 या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi
Select Language