Ad will apear here
Next
स्त्रीसंवेद्य
स्त्रीच्या मनाला विविध कंगोरे असतात. ते जाणून घेते. साहित्याच्या स्त्रीमनाचा शोध डॉ. नीलिमा गुंडी यांनी ‘स्त्रीसंवेद्य’मधून घेतला आहे. याचा प्रारंभ एकोणिसाव्या शतकातील महत्त्वाच्या लेखिका ताराबाई शिंदे यांच्यापासून केला आहे.

स्त्रीवर लादलेले ‘दुय्यम नागरिकत्त्व’, पोथीपुराणातील स्त्रीधर्माबाबच्या अतिशयोक्त कल्पना, विधवा पुनर्विवाह, स्त्रीची उन्नत्ती व शिक्षण या विषयांवरील ताराबाईंच्या लेखनाचा आढावा यात घेतला आहे. पहिल्या भारतीय महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्याशी स्त्रीच्या जगण्याविषयी पत्रातून संवाद साधत लेखिकेने त्यांच्याविषयीचे कुतूहल व्यक्त केले आहे. इंदिराबाई वाडीकर यांची चाकोरी ओलांडण्याची वृत्ती व महिलांसाठी त्यांनी केलेल्या कार्याची माहिती यातून मिळते.

ज्ञानव्रती दुर्गाबाई भागवत, शकुंतलाबाई व सई परांजपे या मायलेकींचे कर्तृत्व, मराठी स्त्रीसाहित्यविश्वात वैचारिक सकस लेखन करणाऱ्या प्रज्ञावंत लेखिका प्रतिभा रानडे यांची ओळख होते; तसेच पद्मजा फाटक, इंदिरा संत, मलिका अमर शेख, कविता महाजन आदी कवयित्री, लेखिकांचे साहित्य व ‘मिळून साऱ्याजणी’च्या वाटचालीचा मागोवा यात घेतला आहे.

पुस्तक : स्त्रीसंवेद्य : स्त्रीच्या भावविश्वाचा शोध
लेखक : डॉ. नीलिमा गुंडी
प्रकाशक : अभिजित प्रकाशन
पाने : १५२
किंमत : २०० रुपये

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)


 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language