Ad will apear here
Next
पंढरपुरात ‘अभाविप’तर्फे भव्य तिरंगा पदयात्रा


सोलापूर :
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पंढरपूर शाखेतर्फे पंढरपुरात नुकतेच ११११ फूट लांबीचा तिरंगा घेऊन पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. शहराच्या मध्यवर्ती भागातून काढण्यात आलेल्या या पदयात्रेत विविध महाविद्यालयांमधील चार हजारांहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. 

शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करण्यासोबतच राष्ट्रभक्ती आणि संविधानाची तत्त्वे युवकांच्या मनावर कोरण्याचे काम अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) गेली ७० वर्षे करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून या यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. स्वातंत्र्यानंतर ७० वर्षांनी ३७० आणि ३५ अ कलम रद्द करून धाडसी पाऊल उचलले आहे. या पार्श्वभूमीवर युवकांच्या मनामध्ये राष्ट्रभक्ती निर्माण करण्यासाठी या भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या पदयात्रेसाठी ‘अभाविप’चे प्रदेश सहसंघटनमंत्री अभिजित पाटील, वीरमाता वृंदा गोसावी यांची प्रमुख उपस्थिती होती. ही पदयात्रा यशस्वी करण्यासाठी जिल्हाप्रमुख प्रा. मुकुंद पवार, जिल्हा संयोजक प्रणव बाडगंडी, जिल्हा सहसंयोजक शुभम बंडगर व श्रद्धा पावले, शहराध्यक्ष प्रा. संगमनाथ उप्पीन, शहरमंत्री आनंद भुसनर, शहर विद्यार्थिनी प्रमुख पूजा रोंगे, मयूरी देवकाते, ज्ञानेश्वरी मारडकर, भारतमातेच्या रूपामध्ये रोहिणी शिंदे, रेणुका बडवे, ऐश्वर्या विरधे, पंढरपूर शहर विस्तारक विकास खंडागळे, अनुप देवधर, गोपाळ सुरवसे, रोहित पाटुकले, सौरभ शिर्के, स्वप्नील रोपळकर, गौरव घाटे, रितेश पुरंदरे, श्रेयश लाडे, ओंकार रणदिवे, माऊली डुचाळ, प्रथमेश वागरे यांनी विशेष परिश्रम घेतले. पंढरपूर शहरातील अनेक मान्यवर या वेळी उपस्थित होते. माजी आमदार सुधाकरपंत परिचारक, डॉ. बी. पी. रोंगे, माजी आमदार लक्ष्मणराव ढोबळे, राजकुमार पाटील, विवेक परदेशी, मुकुंद देवधर, संजय वाईकर, प्रा. सूरज रोंगे, वीरपिता मुन्नागिर गोसावी, शिवाजीराव बंडगर, श्रीकांत बागल, डॉ. सौ. संगीता पाटील, अपर्णा तारके, चंकेश्वरा आदींचा त्यात समावेश होता. 
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language