Ad will apear here
Next
‘साहो’चे नवीन पोस्टर प्रदर्शित
सोशल मीडियावर पोस्टरची जोरदार चर्चा

मुंबई : येत्या ३० ऑगस्टला प्रदर्शित होणार असलेला अभिनेता प्रभासचा ‘साहो’ हा चित्रपट सध्या सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली असतानाच आता या चित्रपटाचे आणखी एक पोस्टर प्रदर्शित झाले आहे. सोशल मीडियावर शेअर केल्या गेलेल्या या पोस्टरचीही जोरदार चर्चा असल्याचे पाहायला मिळत आहे. 

अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि प्रभास यांच्या जोडीचा हा चित्रपट असून ही जोडी पडद्यावर एकत्रित पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. हातात बंदुक घेऊन शत्रूंचा सामना करत असलेले प्रभास आणि श्रद्धा कपूर दिसणारे हे पोस्टर श्रद्धाने आपल्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केले आहे. अॅक्शनचा भरणा असलेल्या या चित्रपटात या दोघांव्यतिरिक्त नील नितीन मुकेश, महेश मांजरेकर, चंकी पांडे हे कलाकारदेखील दिसणार आहेत. 

प्रभास या चित्रपटात एका गुप्तहेराच्या भूमिकेत दिसणार असून या चित्रपटातील त्याच्या अॅक्शनच्या दृश्यांची तयारी करून घेण्यासाठी हॉलीवूडमधील ५० जणांची टीम त्याच्यावर मेहनत घेत आहे. दिग्दर्शक सुजीत यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट हिंदी, तेलगू आणि तमिळ अशा तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. 
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi
Select Language