Ad will apear here
Next
महिलांसाठी व्यावसायिक अभ्यासक्रम
पुणे : येथील ‘महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थे’च्या ‘श्री मणीलाल नानावटी व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्युट’तर्फे महिलांसाठी कौशल्य शिक्षण अभ्यासक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

याअंतर्गत १८ ते २० फेब्रुवारी असे तीन दिवस ‘पंजाबी फूड मेकिंग’ अभ्यासक्रम घेण्यात येणार आहे. यामध्ये आलू पराठा, व्हेज पनीर सँडविच, पराठा, ग्रेव्ही-व्हाईट, पालक पनीर, पनीर मसाला, मिक्स व्हेज पुलाव बिर्याणी हे पदार्थ शिकवण्यात येणार आहेत. 

‘महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था’ शिक्षणातून महिलांचे सबलीकरण व्हावे या उद्देशाने गेली ११७ वर्षे उल्लेखनीय कार्य करत आहे. महिलांसाठी कौशल्य शिक्षणाची गरज ओळखून संस्थेच्या ‘मणीलाल नानावटी व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्युट’च्या वतीने महिलांसाठी विविध प्रकारचे कोर्सेस चालवले जातात. या अभ्यासक्रमांचा फायदा जास्तीत जास्त महिलांना व्हावा यासाठी संस्थेतर्फे प्रयत्न केले जातात. 

या तीन दिवसीय अभ्यासक्रमासाठी इच्छुक महिलांनी संस्थेच्या अनिता जाधव यांच्याशी ९४०३७ ६४२६२ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. 
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language